Jitendra Awhad | टीम महाराष्ट्र देशा: अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासह राष्ट्रवादीचे 40 आमदार भाजप-शिंदे सरकारमध्ये सामील झाले आहे. या घटनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन गट पडले. राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर अजित पवार आणि सुप्रिया सुळे (Supriya Sule) एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसले आहे. या पार्श्वभूमीवर जितेंद्र आव्हाड यांनी एक खळबळजनक वक्तव्य केलं आहे.
अजित पवार यांनी शरद पवारांकडं (Sharad Pawar) परत यावं, अशी विनंती जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी अजित पवारांना केली आहे. जितेंद्र आव्हाड म्हणाले,”आम्ही त्या दोन-चार जणांमुळे बाहेर पडलो असं अजित पवार गट सांगत आहेत. त्यांनी जर आमच्यामुळे पक्ष सोडला असेल तर मी शपथ देतो, मी विश्वास देतो की ते जर परत येणार असेल तर मी राजकारण सोडून जातो. जाताना मी माझ्यासोबत जयंत पाटलांना देखील घेऊन जातो.”
We leave everything -Jitendra Awhad
पुढे बोलताना ते (Jitendra Awhad) म्हणाले, “अजित पवार गट जयंत पाटील (Jayant Patil) आणि आमच्यावर टीका करत आहे की बडव्यांनी शरद पवार साहेबांना घेरलं आहे. या बडव्यांना नाही राहायचं. त्याचबरोबर आम्हाला काहीही नको. आम्ही सगळं सोडून जातो. तुम्ही फक्त परत या साहेबांना त्रास देऊ नका.”
दरम्यान, जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. त्याचबरोबर जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या या वक्तव्यावर अजित पवार गटाकडून काय प्रतिक्रिया येतील? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महत्वाच्या बातम्या
- Supriya Sule | आलं तर आलं तुफान; राष्ट्रवादीच्या फुटीनंतर सुप्रिया सुळेंचं ‘ते’ ट्विट व्हायरल
- Aditya Thackeray | “खुर्चीचा मोह, नाती तोडतो…”; आदित्य ठाकरे यांचा नीलम गोऱ्हेंवर घणाघात
- Anil Parab | “ना इकडच्या न तिकडच्या अशी अवस्था…”; अनिल परब यांचा नीलम गोऱ्हे यांना खोचक टोला
- Mahesh Manjrekar | “माझ्या मुलानं सांगितलं तो ‘गे’ आहे तर…”; महेश मांजरेकरांचं खळबळजनक वक्तव्य
- Neelam Gorhe | “सटरफटर लोकांमुळे नाराज…”; नीलम गोऱ्हे यांचा सुषमा अंधारेंवर घणाघात