Share

Jayant Patil | पुरोगामी विचारांचे वादळ उठणार महाराष्ट्रभर पसरणार; जयंत पाटलांचं ‘ते’ ट्विट चर्चेत

Jayant Patil | टीम महाराष्ट्र देशा: अजित पवार (Ajit Pawar) यांनी केलेल्या बंडानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन गट झाले आहे. त्यानंतर अजित पवार गटानं पक्षाचे चिन्ह आणि पक्षावर दावा ठोकला आहे. अजित पवारांना प्रत्युत्तर देण्यासाठी शरद पवार (Sharad Pawar) तयार झाले आहे. पक्षात फूट पडल्यानंतर शरद पवार आज राज्यात पहिली जाहीर सभा घेणार आहे. याच पार्श्वभूमीवर … Read more

Published On: 

Jayant Patil | टीम महाराष्ट्र देशा: अजित पवार (Ajit Pawar) यांनी केलेल्या बंडानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन गट झाले आहे. त्यानंतर अजित पवार गटानं पक्षाचे चिन्ह आणि पक्षावर दावा ठोकला आहे. अजित पवारांना प्रत्युत्तर देण्यासाठी शरद पवार (Sharad Pawar) तयार झाले आहे. पक्षात फूट पडल्यानंतर शरद पवार आज राज्यात पहिली जाहीर सभा घेणार आहे. याच पार्श्वभूमीवर जयंत पाटील यांनी एक ट्विट केलं आहे.

जयंत पाटील (Jayant Patil) यांनी ट्विट करत अजित पवार गटाला बजावलं आहे. महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा पुरोगामी विचारांचं वादळ उठणार आणि पसरणार असल्याचं जयंत पाटील यांनी या ट्विटमध्ये म्हटलं आहे. जयंत पाटील यांचं हे ट्विट तुफान व्हायरल होत आहे.

Once again a storm of progressive ideas will arise – Jayant Patil

ट्विट करत जयंत पाटील (Jayant Patil) म्हणाले, “पुन्हा एकदा पुरोगामी विचारांचे वादळ उठणार, महाराष्ट्रभर पसरणार…आदरणीय शरदचंद्र पवार साहेब यांच्या महाराष्ट्र दौऱ्याला आज नाशिक जिल्ह्यातील येवल्यापासून सुरुवात होत आहे. त्यांचा आपल्यावरील विश्वास सार्थ करण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहूयात. सभेची वेळ-सायंकाळी ४ वाजता.”

दरम्यान, छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांचा बालेकिल्ला असलेल्या नाशिकच्या येवला मतदारसंघात शरद पवारांची जाहीर सभा होणार आहे. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर शरद पवार (Jayant Patil) मैदानात उतरले आहे. या सभेचा शरद पवार काय बोलतील? याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही