🕒 1 min read
Ajit Pawar | मुंबई: आज मुंबईमध्ये अजित पवार गटाची बैठक सुरू आहे. अजित पवारांकडे शरद पवारांपेक्षा (Sharad Pawar) जास्त संख्याबळ असल्याचं या बैठकीत दिसून आलं आहे. यावेळी बोलत असताना अजित पवार यांनी शरद पवारांवर शाब्दिक हल्लाबोल चढवला आहे. आम्ही कुणाच्या पोटी जन्माला आलो नाही ही आमची चूक आहे का? असा अप्रत्यक्ष टोला अजित पवारांनी शरद पवारांना लगावला आहे.
अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले, “मी शरद पवार यांच्या छत्रछायेखाली घडलो आहे. मी कुठे चुकलो तर शरद पवार यांनी मला ते हक्कानं सांगावं. मी ती चूक मान्य करून दुरुस्त करून पुढे जाईल. मात्र हे कुणासाठी आणि कशासाठी चाललं आहे. का राज्यात असं चित्र निर्माण केलं जातं? आम्ही कुणाच्या पोटी जन्माला आलो नाही ही आमची चूक आहे का?”
Are you (Sharad Pawar) going to stop or not? – Ajit Pawar
पुढे बोलताना ते (Ajit Pawar) म्हणाले, “तुमचं (शरद पवार) वय आता 83 झालं आहे. तुम्ही थांबणार आहात की नाही? तुम्ही आशीर्वाद द्या ना. तुम्हाला दीर्घायुष्य लाभाव, असं आम्हाला नेहमी वाटतं. सुप्रियाला राष्ट्रीय अध्यक्ष करण्यासाठी आम्ही तयार झालो होतो. पुन्हा दोन दिवसानंतर काय घडलं काय माहित? त्यांनी पुन्हा राजीनामा मागे घेतला.
“शरद पवारांना राजीनामा मागे घ्यायचा होता तर त्यांनी राजीनामा का दिला? ते देखील मला कळलं नाही. आमच्यात राजकारण चालवायची धमक असूनही आम्हाला आशीर्वाद का दिला जात नाही?”, असा सवाल देखील अजित पवारांनी (Ajit Pawar) उपस्थित केला आहे.
महत्वाच्या बातम्या
- Praful Patel | शरद पवारांनी आमच्या भावना समजून आम्हाला आशीर्वाद द्यावा – प्रफुल्ल पटेल
- Dhananjay Munde | अजित पवार नेहमी टीकेचे धनी होतात – धनंजय मुंडे
- Ajit Pawar | अजित पवारांच्या बैठकीत शरद पवारांच्या नावाची रिकामी खुर्ची? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
- Chhagan Bhujbal | शरद पवार आमचे विठ्ठल आहे, पण त्या विठ्ठलाला बडव्यांनी घेतलंय – छगन भुजबळ
- Chhagan Bhujbal | “शरद पवारांनी मला बोलावलं तर…”; छगन भुजबळांचं खळबळजनक वक्तव्य
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now











