Dhananjay Munde | अजित पवार नेहमी टीकेचे धनी होतात – धनंजय मुंडे

Dhananjay Munde | मुंबई: अजित पवार (Ajit Pawar) यांच्या बंडखोरीनंतर राष्ट्रवादीचे दोन गट पडले आहे. राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाची आज मुंबईमध्ये बैठक सुरू आहे. अजित पवार गटाच्या बैठकीमध्ये धनंजय मुंडे यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. अजित पवार नेहमी टीकेचे धनी झाले असल्याचं धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे. धनंजय मुंडे (Dhananjay Munde) म्हणाले, “गेली अनेक वर्ष आम्ही … Read more

Published On: 

Dhananjay Munde | मुंबई: अजित पवार (Ajit Pawar) यांच्या बंडखोरीनंतर राष्ट्रवादीचे दोन गट पडले आहे. राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाची आज मुंबईमध्ये बैठक सुरू आहे. अजित पवार गटाच्या बैठकीमध्ये धनंजय मुंडे यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. अजित पवार नेहमी टीकेचे धनी झाले असल्याचं धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे.

धनंजय मुंडे (Dhananjay Munde) म्हणाले, “गेली अनेक वर्ष आम्ही शरद पवार साहेबांची सेवा केली आहे. शरद पवार साहेब विठ्ठल आणि आम्ही वारकऱ्यांसारखे राहिलो आहोत. अजित पवार कायम साहेबांसोबत उभे राहिले आहे. अजित पवारांवर आतापर्यंत बरीच टीका झाली आहे. त्याचबरोबर त्यांनी खूप अपमान सहन केला आहे. अजितदादा नेहमी टीकेचे धनी झाले आहे. मात्र, त्यांनी त्याबद्दल कधीही तक्रार केली नाही. त्यांनी शरद पवार साहेबांसाठी हे सगळं सहन केलं आहे.”

Ajit Pawar was defamed in everything – Dhananjay Munde

पुढे बोलताना ते (Dhananjay Munde) म्हणाले, “आज माझ्यासारख्या ऊसतोड मजुराच्या पोराला तुमच्यासमोर बोलण्याची ताकद अजित दादांनी दिली आहे. अजित पवारांना प्रत्येक गोष्टीत बदनाम केलं गेलं. म्हणून त्यांनी हा स्वाभिमानाचा मार्ग निवडला आहे.”

“आज माझ्या डोळ्यातील अश्रू दिसत नाही. कारण माझं मन आज रडत आहे”, असही ते (Dhananjay Munde) यावेळी म्हणाले आहे. धनंजय मुंडे यांनी केलेल्या या वक्तव्यानंतर शरद पवार गट आणि अजित पवार गटामध्ये नवा वाद निर्माण होण्याची शक्यता झाली आहे.

महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत

पत्रकार

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही