Share

Chhagan Bhujbal | शरद पवार आमचे विठ्ठल आहे, पण त्या विठ्ठलाला बडव्यांनी घेतलंय – छगन भुजबळ

Chhagan Bhujbal | मुंबई: शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाल्यानंतर अजित पवार (Ajit Pawar) गटाची आज बैठक सुरू आहे. या बैठकीमध्ये बोलत असताना छगन भुजबळ यांनी खळबळजनक वक्तव्य केलं आहे. आम्ही सगळ्या गोष्टींचा विचार करून शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झालो आहोत, असं छगन भुजबळ म्हणाले आहे. We will not work outside the law – Chhagan Bhujbal छगन भुजबळ … Read more

Published On: 

Chhagan Bhujbal | मुंबई: शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाल्यानंतर अजित पवार (Ajit Pawar) गटाची आज बैठक सुरू आहे. या बैठकीमध्ये बोलत असताना छगन भुजबळ यांनी खळबळजनक वक्तव्य केलं आहे. आम्ही सगळ्या गोष्टींचा विचार करून शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झालो आहोत, असं छगन भुजबळ म्हणाले आहे.

We will not work outside the law – Chhagan Bhujbal

छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) म्हणाले, “सकाळी उठून विचार केला आणि शपथविधी झाला असं होत नसतं. आम्ही सर्व बाजूंनी विचार केला. सर्व बाबी कायदेशीर तपासून पाहिल्या आणि मग आम्ही भाजपसोबत गेलो. कायद्याच्या बाहेर जाऊन आम्ही काम करणार नाही. सुप्रीम कोर्ट काय निर्णय घेईल? या सगळ्यांचा अभ्यास आणि विचार करून आम्ही हे निर्णय घेतले आहेत.”

पुढे बोलताना ते (Chhagan Bhujbal) म्हणाले, “लोक आम्हाला विचारतात शरद पवारांचा (Sharad Pawar) फोटो का लावला? त्यांना कोण सांगणार की शरद पवार साहेब आमचे विठ्ठल आहे. पण त्या विठ्ठलाला बडव्यांनी घेतलं आहे. शरद पवारांनी त्या बडव्यांना बाजूला करून आम्हाला भेटायला यावं, अशी मी त्यांना विनंती करतो. त्यांनी आम्हाला आशीर्वाद द्यावा.”

“दोन दिवसापूर्वी अजित पवारांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राज्य सरकारमध्ये सामील झाला. या गोष्टीचा सगळ्यांना मोठा धक्का बसला आहे. मात्र, या घटनेनंतर आमच्याकडे 40 आमदार आहे. सगळ्या आमदारांच्या प्रतिज्ञापत्रावर सह्या देखील आहे,” असही ते (Chhagan Bhujbal) यावेळी म्हणाले

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install