Praful Patel | “तेव्हा 51 आमदारांनी भाजपसोबत जाण्याची इच्छा व्यक्त केली पण शरद पवारांनी…”; प्रफुल्ल पटेल यांचा गौप्यस्फोट

Praful Patel | टीम महाराष्ट्र देशा: अजित पवार (Ajit Pawar) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत बंडखोरी करून वेगळा गट स्थापन केला आहे. त्यांच्या गटात प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, सुनील तटकरे आदी नेते सामील झाले आहे. या सर्व घडामोडीनंतर प्रफुल्ल पटेल यांनी मोठा गौप्यस्पोट केला आहे. टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीमध्ये प्रफुल्ल पटेल यांनी मोठं वक्तव्य केलं … Read more

Published On: 

Praful Patel | टीम महाराष्ट्र देशा: अजित पवार (Ajit Pawar) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत बंडखोरी करून वेगळा गट स्थापन केला आहे. त्यांच्या गटात प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, सुनील तटकरे आदी नेते सामील झाले आहे. या सर्व घडामोडीनंतर प्रफुल्ल पटेल यांनी मोठा गौप्यस्पोट केला आहे. टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीमध्ये प्रफुल्ल पटेल यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

51 NCP MLAs had expressed their desire to go with BJP to Sharad Pawar – Praful Patel

प्रफुल्ल पटेल म्हणाले (Praful Patel), “गेल्यावर्षी महाविकास आघाडीचं सरकार पडणार होतं. त्यावेळी राष्ट्रवादीच्या 54 पैकी 51 आमदारांनी भाजपसोबत जाण्याची इच्छा शरद पवारांकडे (Sharad Pawar) व्यक्त केली होती. मात्र, शरद पवार याबाबत निर्णय घेण्यास अपयशी ठरले. पवारांना तातडीने निर्णय घेता आला नाही.

पुढे बोलताना ते (Praful Patel) म्हणाले, “शरद पवारांनी निर्णय न घेतल्यामुळे एकनाथ शिंदेंनी संधी साधून भाजपसोबत जाऊन सरकार स्थापन केलं. राष्ट्रवादीच्या भाजपसोबत जाण्याच्या हालचाली 2022 च्या मध्यापासून सुरू होत्या. त्यामुळे आम्ही महाराष्ट्राच्या विकासासाठी आणि हितासाठी भाजपसोबत हातमिळवणी केली आहे.”

“अनेक मतदारसंघातील आमदारांना निधीसाठी मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्यांचा हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे. पक्षातील मोठे नेते नाहीच तर तळागाळातील कार्यकर्तेही सरकारचा भाग बनले पाहिजे”, असही ते (Praful Patel) यावेळी म्हणाले.

महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत

पत्रकार

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही