Share

Ashish Shelar | दिमतीला ठेवला शापित दरबारी, अवतार शकुनीचा नाम मात्र “संजय” धारी; आशिष शेलारांचा संजय राऊतांवर घणाघात

Ashish Shelar | टीम महाराष्ट्र देशा: अजित पवार (Ajit Pawar) यांनी केलेल्या बंडानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. या प्रकरणानंतर संजय राऊत (Sanjay Raut) यांनी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर टीका केली होती. अजित पवार यांच्या बंडानंतर एकनाथ शिंदे आणि त्यांचे 40 आमदार घरी जाणार असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. संजय राऊत यांच्या … Read more

Published On: 

Ashish Shelar | टीम महाराष्ट्र देशा: अजित पवार (Ajit Pawar) यांनी केलेल्या बंडानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. या प्रकरणानंतर संजय राऊत (Sanjay Raut) यांनी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर टीका केली होती. अजित पवार यांच्या बंडानंतर एकनाथ शिंदे आणि त्यांचे 40 आमदार घरी जाणार असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. संजय राऊत यांच्या या वक्तव्यावर आशिष शेलार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी ट्विट करत संजय राऊतांवर टीकास्त्र चालवलं आहे. दिमतीला ठेवला शापित दरबारी, अवतार शकुनीचा नाम मात्र “संजय” धारी, असं शेलार यांनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

ट्विट करत आशिष शेलार (Ashish Shelar) म्हणाले, “अहंकारी राजा आणि पुत्र विलासी
दिमतीला ठेवला शापित दरबारी
अवतार शकुनीचा नाम मात्र “संजय” धारी

अहंकारी राजाला आवडे खोटी स्तुती भारी
संजय मग बिनधास्त दुसऱ्याचे बाप काढी
काय ती रोज सुरु असायची सरबराई!

बघा काय अवकळा आली
गेली गेली सत्ता गेली, पक्ष ही गेला
अहंकारी राजा, विलासी पुत्र आणि संजय तेवढा उरला

झाला मोह “जाणत्या राजांना” याच संजयाचा
अखेर बसला फटका त्यांनाही शापित दरबाऱ्याचा

आम्ही सांगतं होतो वारंवार यांना
आवरा कि हो, या तुमच्या विश्वविख्यातांना

आता बांधा पुतळा या तुमच्या विश्वविख्यातांचा
यापेक्षा काय सन्मान करणार या शापित दरबाऱ्यांचा!”

Ajit Pawar broke the record of swearing in as Deputy Chief Minister – Sanjay Raut

दरम्यान, काल अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली (Ashish Shelar) आहे. त्यांच्या या शपथविधीवर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. अजित पवारांनी आत्तापर्यंत पाच वेळा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेण्याचा विक्रम मोडला असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install