Arnala ocean | धक्कादायक! पावसात समुद्रावर ३ मित्र पोहायला गेले, पाण्याचा अंदाज न आल्यामुळे एकाचा मृत्यू

Arnala ocean | अर्नाळा । सध्या संपूर्ण राज्यामध्ये मुसळधार पाऊस (heavy rain) पडत आहे. यामुळे वातावरणामध्ये देखील मोठे बदल झाले आहेत. त्यामुळे अनेकजण फिरण्यासाठी वेगेवेगळ्या ठिकाणी जात आहेत. लोकांना मान्सूनमध्ये फिरायला जाण्याचा मोह आवरत नाही. ट्रेकिंग, समुद्रकिनारा, धबधब्यावर जाण्यास लोक प्राधान्य देतात. त्यामुळे या ठिकाणी अनेकजण फिरण्यासाठी जात आहेत. मात्र पावसाळ्यामध्ये अशा ठिकाणी फिरण्यास जाण्याचा … Read more

Published On: 

Arnala ocean | अर्नाळा । सध्या संपूर्ण राज्यामध्ये मुसळधार पाऊस (heavy rain) पडत आहे. यामुळे वातावरणामध्ये देखील मोठे बदल झाले आहेत. त्यामुळे अनेकजण फिरण्यासाठी वेगेवेगळ्या ठिकाणी जात आहेत. लोकांना मान्सूनमध्ये फिरायला जाण्याचा मोह आवरत नाही. ट्रेकिंग, समुद्रकिनारा, धबधब्यावर जाण्यास लोक प्राधान्य देतात. त्यामुळे या ठिकाणी अनेकजण फिरण्यासाठी जात आहेत. मात्र पावसाळ्यामध्ये अशा ठिकाणी फिरण्यास जाण्याचा मोह आवरायला हवा. कारण की, हाच मोह अंगाशी येऊ शकतो. सध्या देखील एका तरुणाला फिरायला जाणे चांगलेच महागात पडले आहे. तरुणासोबत अत्यंत हृदयद्रावक घटना घडल्याची माहिती समोर आली आहे.

18- time-old drowned in Arnala ocean

माहितीनुसार, अर्नाळा समुद्रामध्ये 18 वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अमित संतोष गुप्ता( Amit Santosh Gupta) असं या तरुणाचं नाव आहे. हा तरुण त्याच्या मित्रांसोबत अर्नाळा समुद्रात( Arnala Sea) पोहायला गेला होता यावेळी त्याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

अमित हा नालासोपारा (Nalasopara) पूर्व आचोळा या ठिकाणचा रहिवासी असून काल तो त्याच्या तीन मित्रांसोबत समुद्रकिनारी पोहायला गेला होता. यावेळी पाण्याचा अंदाज न आल्याने अमित पाण्यात बुडाला. या घटनेची माहिती मिळताच त्याला पाण्याच्या बाहेर काढण्यात आले आणि तातडीने रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. मात्र रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. त्याच्या मृत्यूने कुटुंबावर शोककळा पसरली आहे.

दरम्यान, समुद्र किनाऱ्यावर हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. तरीदेखील लोक समुद्रकिनारी जाऊन पोहत आहेत. त्यामुळे काहींना जीव देखील गमवावा लागत आहे. त्यामुळे पर्यटकांनी समुद्र किनाऱ्यावर जाऊ नये असे अहवान प्रशासना कडून करण्यात येत आहे.

महत्वाच्या बातम्या :

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
Maharashtra Desha

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही