Share

NCP | राष्ट्रवादीचा महत्वाचा नेता भाजपच्या वाटेवर; ‘पवारांनी राजीनामा दिला तेव्हा फक्त रडायचं नाटक…’

NCP | मुंबई: 20 जून 2022 रोजी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केलेल्या बंडामुळे आज राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून गद्दार दिन साजरा केला जात आहे. राष्ट्रवादी गद्दार दिन साजरा करत असताना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी मोठा खुलासा केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) हे भाजपच्या वाटेवर असल्याचा दावा … Read more

Published On: 

NCP | मुंबई: 20 जून 2022 रोजी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केलेल्या बंडामुळे आज राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून गद्दार दिन साजरा केला जात आहे. राष्ट्रवादी गद्दार दिन साजरा करत असताना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी मोठा खुलासा केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) हे भाजपच्या वाटेवर असल्याचा दावा संजय शिरसाट यांनी केला आहे.

Jayant Patil is on the way to BJP

माध्यमांशी संवाद साधत असताना संजय शिरसाट म्हणाले, “राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे भाजपच्या वाटेवर आहे. शरद पवार (Sharad Pawar) यांनी राजीनामा दिला होता, तेव्हा जयंत पाटील यांनी फक्त रडायचं नाटक केलं होतं. शरद पवार यांनी राजीनामा दिल्यामुळं ते रडत नव्हते. त्यांचं रडण्याचं कारण वेगळं होतं.”

पुढे बोलताना ते म्हणाले, “भाजप आणि शिंदे गटात महाविकास आघाडीतून येणाऱ्या लोकांची संख्या वाढत चालली आहे. ठाकरे गटाच्या महिला आमदार मनीषा कायंदे यांनी दोन दिवसांपूर्वी शिंदे गटात प्रवेश केला. त्याच्यानंतर राष्ट्रवादीचे (NCP) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आगामी काळात भाजपमध्ये येतील.”

जयंत पाटील (NCP) काँग्रेसच्या वाटेवर असल्याचा चर्चा गेल्या काही दिवसापूर्वी राजकीय वर्तुळात सुरू होत्या. अशात संजय शिरसाट यांनी केलेल्या दाव्यानंतर राजकारणात पुन्हा नव्या चर्चा सुरू झाल्या आहेत. संजय शिरसाट यांच्या या वक्तव्यावर जयंत पाटील काय प्रतिक्रिया देतील? याकडं सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install