Aurangabad | छत्रपती संभाजीनगर: राज्यामध्ये गेल्या काही दिवसापासून छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) शहराच्या नावावरून वाद सुरू आहे. औरंगाबादचं नाव छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) करण्यात यावी अशी मागणी केली आहे. त्याचबरोबर या प्रकरणावरून सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसत आहेत. अशात आज शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आंदोलनात औरंगाबाद म्हणून बॅनर झळकले आहे.
’50 khoke’ movement by NCP in Aurangabad city
आज (20 जून) एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेल्या बंडाला एक वर्ष पूर्ण झालं आहे. आजच्या दिवशी (20 जून 2022) एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत युती केली होती. त्यानंतर राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झालं. त्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आज ‘गद्दार दिन’ साजरा केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर (Aurangabad) शहरामध्ये राष्ट्रवादीकडून ’50 खोके’ आंदोलन करण्यात आलं आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्ष श्री ख्वाजा शरफोद्दीन मुल्ला यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन क्रांती चौकात पार पडलं. या आंदोलनात मनोज घोडके, आप्पा पाटील, मयूर सोनवणे, अय्युब खान, खय्युम शेख आदी लोक सहभागी होते. 50 खोके माजली बोके, चले जाओ चले जाओ गद्दर सरकार गुवाहाटी चले जाओ, गद्दर हटाव महाराष्ट्र बचाव, गद्दारांचे डोके खोक्यांनीच ओके, असे नारे यावेळी राष्ट्रवादीकडून देण्यात आले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून छत्रपती संभाजीनगर (Aurangabad) शहरामध्ये ’50 खोके’ आंदोलन करण्यात आलं आहे. या आंदोलनातील बॅनर्सवर शहराचा औरंगाबाद असा उल्लेख करण्यात आला आहे.
Sharad Pawar statement on renaming aurangabad as Chhatrapati Sambhajinagar?
काही दिवसापूर्वी शरद पवार छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर आले होते. त्यावेळी त्यांनी शहराच्या नावाबद्दल भाष्य केलं असल्याचा दावा करण्यात आला होता. मी शहराला छत्रपती संभाजीनगर नाही तर औरंगाबादच म्हणणार असं विधान शरद पवारांनी केल्याचा दावा न्यूज़ 18 lokmat ने केला होता. यावरून भाजपनं शरद पवारांना धारेवर धरलं होतं. या सर्व प्रकरणावरून मोठा वाद निर्माण झाला होता.
आज (20 जून) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून छत्रपती संभाजीनगर (Aurangabad) शहरामध्ये ’50 खोके’ आंदोलन करण्यात आलं आहे. या आंदोलनातील बॅनर्सवर शहराचा औरंगाबाद असा उल्लेख करण्यात आला आहे. यावरून राज्यातील राजकीय वर्तुळात नवा वाद सुरू होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
BJP targeted Sharad Pawar
दरम्यान, या प्रकरणावरून भाजपनं शरद पवार यांच्यावर निशाणा साधला होता. हे राज्य हा देश छत्रपती शिवाजी राजांचा आणि धर्मवीर छत्रपती संभाजी राजांचा आहे. पण शरद पवार तुम्हाला औरंग्याचा इतका पुळका का?, असं ट्विट भाजपनं केलं होतं.
मतांसाठी इतके लाचार झाला की औरंग्यासाठी धर्मवीर छत्रपती संभाजी राजांचा तुम्ही अपमान करता. हे राज्य हा देश छत्रपती शिवाजी राजांचा आणि धर्मवीर छत्रपती संभाजी राजांचा आहे. पण @PawarSpeaks तुम्हाला औरंग्याचा इतका पुळका का? #Maharashtra #Kolhapur pic.twitter.com/4WoDsj2raj
— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) June 7, 2023
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष आणि पक्षाचे प्रवक्ते सुरज चव्हाण यांनी याबद्दल स्पष्टीकरण दिलं होतं. शरद पवार यांच्या सोबत मी दोन दिवसापासून संभाजीनगर दौऱ्यावर आहे. या दौऱ्यादरम्यान पवारांनी कोणत्याही कार्यक्रमात शहराच्या नामांतराविषयी भाष्य केलं नाही, असं सुरज चव्हाण यांनी ट्विट केलं होतं.
छत्रपती संभाजीनगर येथे दोन दिवसापासून मी आदरणीय पवार साहेबांच्या सोबत आहेत. साहेबांनी कुठल्याच कार्यक्रमात या शहराच्या नामांतराविषयी आपले मत मांडलेले नाही.@News18lokmat ने खोडसाळपणा केला आहे.या वाहिनीच्या विरोधात राष्ट्रवादीकडून कायदेशीर कारवाईची प्रक्रिया आम्ही सुरु करणार आहोत.
— Suraj Chavan (सूरज चव्हाण) (@surajvchavan) June 7, 2023
The Mahavikas Aghadi government had renamed Aurangabad city
औरंगाबाद आणि उस्मानाबाद या दोन्ही शहराचं नामांतर महाविकास आघाडी सरकारच्या काळात झालं होतं. त्यांनी औरंगाबादचं नाव संभाजीनगर तर उस्मानाबादचं नाव धाराशिव केले होतं. मात्र, शिंदे-फडणवीस सरकारनं सत्तेत आल्यानंतर तो आदेश रद्द करून नवीन आदेश काढला होता. औरंगाबादचं छत्रपती संभाजीनगर तर उस्मानाबादचं धाराशिव नामांतर केलं.
महत्वाच्या बातम्या
- Pune Crime | पुण्यात कोयता गँगनंतर रुमाल गँगची दहशत! वनशिव झोपडपट्टी परिसरात फोडल्या गाड्या
- Deepak Kesarkar | ‘गद्दर दिवस साजरा’ झालाच पाहिजे; ठाकरे गटाच्या मागणीला दीपक केसरकरांचा पाठिंबा?
- Sanjay Raut | ज्या आईनं मोठं केलं त्याच आईच्या पोटात खंजीर खुपसलं – संजय राऊत
- NCP | ’50 खोके एकदम OK’ म्हणतं राष्ट्रवादीचं गद्दार दिन आंदोलन
- Covid – 19 | गुड न्यूज! सोमवारी मुंबईत शून्य कोरोनाबाधितांची नोंद