Ambadas Danve | ‘गद्दार दिन’ साजरा करण्यात यावा, यासाठी अंबादास दानवेंचं माजी राज्यपालांना पत्र

Ambadas Danve | टीम महाराष्ट्र देशा: आज शिवसेनेचा 57 वा वर्धापन दिन साजरा केला जात आहे. आजचा (19 जून) दिवस निष्ठावंतांचा दिवस आहे, असं ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटलं होतं. त्याचबरोबर जगभरात जागतिक गद्दर दिवस साजरा करण्यात यावा, यासाठी मी युनोला पत्र लिहिणार आहे, असंही संजय राऊत म्हणाले होते. याच पार्श्वभूमीवर अंबादास दानवे … Read more

Published On: 

Ambadas Danve | टीम महाराष्ट्र देशा: आज शिवसेनेचा 57 वा वर्धापन दिन साजरा केला जात आहे. आजचा (19 जून) दिवस निष्ठावंतांचा दिवस आहे, असं ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटलं होतं. त्याचबरोबर जगभरात जागतिक गद्दर दिवस साजरा करण्यात यावा, यासाठी मी युनोला पत्र लिहिणार आहे, असंही संजय राऊत म्हणाले होते. याच पार्श्वभूमीवर अंबादास दानवे यांनी माजी राज्यपालांना पत्र लिहिलं आहे.

21 जून रोजी जगभरात गद्दार दिन साजरा करण्यात यावा, अशी मागणी अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना पत्राद्वारे केली आहे. उद्धव ठाकरेंचं सरकार असताना तुम्ही त्यांना जाणीवपूर्वक त्रास देण्याचं अविरत काम चालू ठेवलं होतं, असंही त्यांनी या पत्रामध्ये म्हटलं आहे.

Ambadas Danve Tweet on Bhagat Singh Koshyari

जर गतवर्षी झालेल्या गद्दारीची दखल ३३ देशांनी घेतली होती, तर २१ जून रोजी जगभरात ‘गद्दार दिवस’ साजरा करण्यात यावा. या कांडात आपली भूमिका खूप महत्त्वाची राहिली आहे. आपल्यामुळे नावारूपाला आलेल्या या दिवसाला साजरा करण्यासाठी आपण आपले दिल्लीचे पातशाह यांच्या मार्फत संयुक्त राष्ट्राकडे पाठपुरावा, मागणी करावी. हे माझे आपणास आवाहन आहे @BSKoshyari

दरम्यान, या प्रकरणावर संजय राऊत (Sanjay Raut) यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत म्हणाले, “आमचं सरकार आल्यावर दरवर्षी आम्ही गद्दार दिवस साजरा करू. त्याचबरोबर या दिवशी आम्ही चाळीस गद्दरांचं रावणाप्रमाणे दहन करू. जेव्हा-जेव्हा शिवसेनेचं खच्चीकरण करण्याचा प्रयत्न केला आहे, तेव्हा-तेव्हा आम्ही नव्या जोमाने उभे राहिलो आहोत.”

महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत

पत्रकार

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही