Share

Supriya Sule | अजित पवार महाराष्ट्राच्या राजकारणातील अमिताभ बच्चन आहे – सुप्रिया सुळे

🕒 1 min readSupriya Sule | मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे राष्ट्रवादीच्या कार्यकारी अध्यक्षा झाल्यानंतर पहिल्यांदाच मुंबईतील पक्षाच्या कार्यालयात आल्या होत्या. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. माध्यमांशी बोलत असताना त्यांनी अजित पवारांना (Ajit Pawar) अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांची उपमा दिली आहे. अजितदादा महाराष्ट्राच्या राजकारणातील अमिताभ बच्चन आहे, असं त्यांनी यावेळी म्हटलं आहे. … Read more

Published On: 

🕒 1 min read

Supriya Sule | मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे राष्ट्रवादीच्या कार्यकारी अध्यक्षा झाल्यानंतर पहिल्यांदाच मुंबईतील पक्षाच्या कार्यालयात आल्या होत्या. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. माध्यमांशी बोलत असताना त्यांनी अजित पवारांना (Ajit Pawar) अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांची उपमा दिली आहे. अजितदादा महाराष्ट्राच्या राजकारणातील अमिताभ बच्चन आहे, असं त्यांनी यावेळी म्हटलं आहे.

Everyone wants Ajit Pawar in Maharashtra politics – Supriya Sule

सुप्रिया सुळे (Supriya Sule) म्हणाल्या, “चित्रपट सृष्टीमध्ये जसं सर्वांनाच अमिताभ बच्चन हवा असतो, तसचं राजकारणामध्ये सगळ्यांना अजितदादा हवे आहेत. चित्रपट सृष्टीत अमिताभ बच्चन यांचा आवाज, चेहरा, अभिनय, इतकंच काय त्यांची स्वाक्षरी चालते. त्याचप्रमाणे राजकारणात सगळ्यांना अजित पवार हवे आहेत. अजितदादा महाराष्ट्रातल्या राजकारणातले अमिताभ बच्चन आहे.

शिंदे गटाचे नेते दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी अजित पवारांना खुली ऑफर दिली होती. अजित पवार यांच्यासोबत त्यांच्या पक्षात काय होतं? हे सर्वांना माहीत आहे. त्यामुळं अजित पवारांनी आमच्यासोबत येऊन सरकारमध्ये सामील व्हावं, असं ते म्हणाले होते. याच पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.

The government has become insensitive towards women – Supriya Sule

दरम्यान, सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी मुंबईमध्ये घडलेल्या महिला अत्याचाराच्या घटनांवर प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी बोलत असताना त्यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. “मुंबईमध्ये महिलांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. त्याचबरोबर राज्यात दिवसेंदिवस महिला अत्याचाराच्या घटना वाढत चालल्या आहेत. सरकार महिलांबाबत असंवेदनशील झालं आहे.”

 

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!