Share

Sharad Pawar | गुलाबराव पाटील करणार राष्ट्रवादीत प्रवेश? शरद पवारांसोबत प्रवास केल्यानं चर्चांना उधाण

Sharad Pawar | मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आज जळगावला राजधानी एक्सप्रेसने रवाना झाले. राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) त्याच ट्रेनने प्रवास करत होते. दोन्ही नेत्यांनी एकाच रेल्वे डब्यातून प्रवास केल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. शरद पवार यांच्या भेटीनंतर गुलाबराव पाटील राष्ट्रवादी प्रवेश करणार का? अशा चर्चा राजकीय वर्तुळात … Read more

Published On: 

Sharad Pawar | मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आज जळगावला राजधानी एक्सप्रेसने रवाना झाले. राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) त्याच ट्रेनने प्रवास करत होते. दोन्ही नेत्यांनी एकाच रेल्वे डब्यातून प्रवास केल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. शरद पवार यांच्या भेटीनंतर गुलाबराव पाटील राष्ट्रवादी प्रवेश करणार का? अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्या आहे.

Our meeting was not planned – Gulabrao Patil

शरद पवार (Sharad Pawar) आणि गुलाबराव पाटील यांच्यातील ही भेट ठरवून झाली नसण्याची माहिती मिळाली आहे. एका रेल्वेने प्रवास करणं हा फक्त एक योगायोग असल्याचं गुलाबराव पाटील यांनी स्पष्ट केलं आहे. राष्ट्रीय ग्रंथालय सेलच्या कार्यक्रम निमित्ताने शरद पवार जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर गेले आहे. तर गुलाबराव पाटील हे कॅबिनेट बैठक संपवून जळगावला परत चालले होते.

शरद पवार (Sharad Pawar) यांच्यासोबत प्रवास केल्यानंतर गुलाबराव पाटील यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. गुलाबराव पाटील म्हणाले, “शरद पवार आणि माझा रेल्वे प्रवास शेजारी बसून होता. या प्रवासादरम्यान मला त्यांच्यासोबत चर्चा करायची संधी मिळाली आहे. त्यांच्यासोबत मी विकास कामाची चर्चा केलेली असून मला त्यात आनंद वाटला आहे.”

दरम्यान, शरद पवार (Sharad Pawar) आणि गुलाबराव पाटील यांचे रेल्वे डब्यातील फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्यांच्या या प्रवासानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. कारण गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात ज्या घडामोडी घडत आहे, त्यावरून कोण कुणासोबत जाईल? हे सांगता येत नाही.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही