Share

Sharad Pawar – शरद पवारांना मोठा धक्का; राष्ट्रवादीच्या प्रदेश उपाध्यक्षांचा BRS पक्षात प्रवेश

🕒 1 min read Sharad Pawar अहमदनगर : तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव ( Chandrashekhar Roa ) यांच्या भारत राष्ट्र समितीने राज्यात हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. नगर जिल्ह्यातील बडे नेते सध्या भारत राष्ट्र समिती (बीआरएस) पक्षाच्या वाटेवर आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अनेक ठिकाणी विविध कारणांमुळे नाराजी असल्याचे दिसून येते. शरद पवार यांचे विश्वासू राष्ट्रवादी काँग्रेसचे … Read more

Published On: 

🕒 1 min read

Sharad Pawar अहमदनगर : तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव ( Chandrashekhar Roa ) यांच्या भारत राष्ट्र समितीने राज्यात हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. नगर जिल्ह्यातील बडे नेते सध्या भारत राष्ट्र समिती (बीआरएस) पक्षाच्या वाटेवर आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अनेक ठिकाणी विविध कारणांमुळे नाराजी असल्याचे दिसून येते.

शरद पवार यांचे विश्वासू राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष घनश्याम शेलार ( ghanshyam shelar )  यांनी हैदराबाद येथील मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्या निवासस्थानी भारत राष्ट्र समिती (बीआरएस) या पक्षात प्रवेश केला आहे.  शरद पवार यांचे विश्वासू असलेल्या घनश्याम शेलार यांच्या बीआरएस प्रवेशाने राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे. त्यांच्या (बीआरएस) पक्ष प्रवेशामुळे श्रीगोंद्यात राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे.

ncp leader ghanshyam shelar join brs

श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीची उमेदवारी ही राहुल जगताप यांना मिळणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे घनश्याम शेलार ( ghanshyam shelar ) बीआरएस पक्षाकडून निवडणूक लढवणार असल्याचे बोलले जात आहे. शरद पवार यांचे विश्वासू असलेल्या घनश्याम शेलार यांच्या बीआरएस प्रवेशाने राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे.

तेलंगणाचे मुख्यमंत्री केसी राव ( chandrashekhar rao ) यांनी त्यांच्या पक्षाचा विस्तार महाराष्ट्रातही करण्यास सुरुवात केली आहे. नांदेड, छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी अनेक पदाधिकाऱ्यांनी केसीआर यांच्या बीआरएस पक्षात प्रवेश घेतला आहे. अब्दुल कादीर मौलाना यांच्या नेतृत्वाखाली हैदराबाद येथे अहमदनगर जिल्ह्यातील जि.प. सदस्य व नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांनी केसीआर यांच्या बीआरएस पक्षात प्रवेश घेतला

घनश्याम शेलार यांना 2019च्या विधानसभा निवडणुकीत थोडक्यात पराभूत व्हावं लागलं होतं. अवघ्या 2500 मतांनी घनश्याम शेलार ( ghanshyam shelar ) यांचा पराभव झाला होता. श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघातून  घनश्याम शेलार बीआरएस पक्षाकडून निवडणूक लढवणार असल्याचे बोलले जात आहे.

महत्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही