Nilesh Rane | हिम्मत असेल तर राष्ट्रवादीने जितेंद्र आव्हाडांच्या मतदारसंघात आंदोलन करावे – नितेश राणे

Nilesh Rane | मुंबई: राज्यामध्ये सध्या औरंगजेबाचा मुद्दा चांगलाच तापला आहे. या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. याच पार्श्वभूमीवर निलेश राणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर हल्लाबोल केला होता. शरद पवार (Sharad Pawar) म्हणजे औरंगजेबाचा पुनर्जन्म, असं वादग्रस्त वक्तव्य निलेश राणे यांनी केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आक्रमक झालेला … Read more

Published On: 

Nilesh Rane | मुंबई: राज्यामध्ये सध्या औरंगजेबाचा मुद्दा चांगलाच तापला आहे. या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. याच पार्श्वभूमीवर निलेश राणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर हल्लाबोल केला होता. शरद पवार (Sharad Pawar) म्हणजे औरंगजेबाचा पुनर्जन्म, असं वादग्रस्त वक्तव्य निलेश राणे यांनी केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आक्रमक झालेला असून आज राष्ट्रवादी आंदोलन करत आहे.

NCP should protest in Mumbra city

निलेश राणे यांच्या वक्तव्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आंदोलन करणार आहे. या पार्श्वभूमीवर निलेश राणे (Nilesh Rane) यांनी ट्विट करत राष्ट्रवादीला खुलं चॅलेंज दिलं आहे. ट्विट करत निलेश राणे म्हणाले, “माझ्या विरोधात जर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आंदोलन करायचं असेल तर मी त्यांना चॅलेंज करतो की त्यांनी ते मुंब्रा शहरामध्ये म्हणजे जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्या मतदारसंघात करून दाखवावं.”

मालेगाव, मुंब्रा, भिवंडी ही तीन शहर राष्ट्रवादीच्या आजच्या आंदोलनाचे प्रमुख ठिकाण असावेत, असंही त्यांनी (Nilesh Rane) या ट्विटमध्ये म्हटलं आहे. निलेश राणे यांनी केलेल्या वक्तव्यनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आधीच आक्रमक झाला आहे. अशात निलेश राणे यांनी पुन्हा एकदा ट्विट करत राष्ट्रवादीला चॅलेंज केलं आहे.

दरम्यान, निलेश राणे (Nilesh Rane) यांनी ट्विट करत शरद पवार यांच्यावर टीका केली. ट्विट करत निलेश राणे म्हणाले, “निवडणुका जवळ आल्या की पवार साहेब मुस्लिम समाजासाठी चिंताग्रस्त होऊ लागतात. कधी कधी वाटतं औरंगजेबाचा पुनर्जन्म म्हणजे शरद पवार.”

महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत

पत्रकार

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही