Sanjay Raut | औरंग्यांना भाजपकडून ताकद पुरवली जाते; संजय राऊतांचा गंभीर आरोप

Sanjay Raut | मुंबई: राज्यामध्ये औरंगजेबाचा वाद चांगलाच तापला आहे. या मुद्द्यावरून विरोधक आणि सत्ताधारी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर टीका केली आहे. औरंग्यांना भाजपकडून ताकद पुरवली जात असल्याचा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला आहे. BJP has given strength to this Aurangzeb अचानक इतके औरंगजेब … Read more

Published On: 

Sanjay Raut | मुंबई: राज्यामध्ये औरंगजेबाचा वाद चांगलाच तापला आहे. या मुद्द्यावरून विरोधक आणि सत्ताधारी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर टीका केली आहे. औरंग्यांना भाजपकडून ताकद पुरवली जात असल्याचा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला आहे.

BJP has given strength to this Aurangzeb

अचानक इतके औरंगजेब कुठून निर्माण झाले, असा प्रश्न देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उपस्थित केला होता. त्यांच्या या प्रश्नाला उत्तर देत संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले, “हे औरंगजेब तुमच्या अवतीभवती निर्माण झाले आहे. तुम्हीच त्यांना ताकद देतात.”

पुढे बोलताना ते (Sanjay Raut) म्हणाले, “देवेंद्र फडणवीस एक कमजोर गृहमंत्री असल्यामुळे महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्था मागे पडली आहे आणि याची नोंद इतिहासात कायम राहणार आहे. गृहमंत्री म्हणून आमची तुमच्याकडून काहीच अपेक्षा नाही.”

संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या टीकेला भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये (Keshav Upadhye) यांनी उत्तर दिलं आहे. केशव उपाध्ये म्हणाले, “औरंग्याच्या अवलादींचं समर्थन संजय राऊत करत आहे. सत्तेच्या लोभापाई ते देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करत आहेत.”

महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत

पत्रकार

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही