Share

Weather Update | पुढील 48 तास महत्त्वाचे! राज्यात ‘या’ भागात अवकाळी पावसाची शक्याता

🕒 1 min readWeather Update | टीम महाराष्ट्र देशा: राज्यातील वातावरणात सातत्याने बदल होताना दिसत आहे. एकीकडे नागरिक उन्हाने हैराण होत असताना, राज्यात दुसरीकडे अवकाळी पाऊस (Unseasonal rain) पडण्याचा अंदाज पुणे वेधशाळेना वर्तवला आहे. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार राज्यातील बहुतांश भागांमध्ये 31 मे पर्यंत अवकाळी पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. राज्यामध्ये कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि … Read more

Published On: 

🕒 1 min read

Weather Update | टीम महाराष्ट्र देशा: राज्यातील वातावरणात सातत्याने बदल होताना दिसत आहे. एकीकडे नागरिक उन्हाने हैराण होत असताना, राज्यात दुसरीकडे अवकाळी पाऊस (Unseasonal rain) पडण्याचा अंदाज पुणे वेधशाळेना वर्तवला आहे. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार राज्यातील बहुतांश भागांमध्ये 31 मे पर्यंत अवकाळी पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. राज्यामध्ये कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही भागांमध्ये अवकाळी पाऊस बरसणार आहे.

हवामान विभागाने मान्सूनबाबत दिलासादायक माहिती (Weather Update) दिली आहे. पुढील दोन दिवसांमध्ये अंदमान-निकोबार बेट आणि बंगालच्या उपसागराच्या दक्षिण भागात मान्सूनसाठी अनुकूल वातावरण तयार होऊ शकतं. तर राजस्थान आणि मध्यप्रदेशमध्ये चक्रीय स्थिती तयार झाली आहे. त्याचबरोबर दक्षिण भारतातून बाष्पयुक्त वारे राज्याकडे वाहत आहे. त्यामुळे महाराष्ट्रात पावसाची शक्यता निर्माण झाली आहे.

Chance of unseasonal rain in the state for the next 48 hours

दरम्यान, राज्यात जवळपास सर्वच भागांमध्ये मेघगर्जनेसह अवकाळी पाऊस बरसणार (Weather Update) आहे.  राज्यामध्ये रत्नागिरी, नाशिक, सिंधुदुर्ग, अहमदनगर, पुणे, सांगली, सोलापूर, सातारा, छत्रपती संभाजीनगर, जालना, कोल्हापूर, बीड, हिंगोली, लातूर, उस्मानाबाद, परभणी या ठिकाणी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

साधारतः नैऋत्य मान्सून केरळमध्ये दाखल होण्याची सर्वसाधारण तारीख 01 जून असते. मात्र, यंदा मान्सून उशिरा दाखल होणार आहे. केरळमध्ये 04 जून रोजी मान्सून दाखल होण्याची शक्यता वर्तवण्यात (Weather Update) आली आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही