D K Shivakumar | मुख्यमंत्री पदासाठी सिद्धरामय्या यांचे नाव निश्चित; तर डी के शिवकुमार यांना राहुल गांधींची ‘ही’ ऑफर

D K Shivakumar | कर्नाटकचा मुख्यमंत्री कोण असणार या चर्चांना पूर्णविराम लागणार असल्याची माहिती मिळाली आहे. आज (17 मे) काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची डी के शिवकुमार (D K Shivakumar) आणि सिद्धरामय्या यांनी भेट घेतली आहे. भेटीदरम्यान सुमारे तासभर चर्चा झाली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तर सूत्रांच्या माहितीनुसार मुख्यमंत्रीपदासाठी सिद्धरमय्या यांचं नाव … Read more

Published On: 

D K Shivakumar | कर्नाटकचा मुख्यमंत्री कोण असणार या चर्चांना पूर्णविराम लागणार असल्याची माहिती मिळाली आहे. आज (17 मे) काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची डी के शिवकुमार (D K Shivakumar) आणि सिद्धरामय्या यांनी भेट घेतली आहे. भेटीदरम्यान सुमारे तासभर चर्चा झाली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तर सूत्रांच्या माहितीनुसार मुख्यमंत्रीपदासाठी सिद्धरमय्या यांचं नाव अंतिम करण्यात आलं आहे. तर डी के शिवकुमार यांना राहुल गांधी यांनी ऑफर दिली असल्याची देखील माहिती समोर आली आहे.

राहुल गांधींची डी के शिवकुमार यांना ‘ही’ ऑफर

उपमुख्यमंत्रीपद आणि सहा खात्यांची जबाबदारी तुमच्यावर सोपविण्यात येईल ही ऑफर राहुल गांधी यांनी डी के शिवकुमार दिला आहे. दोन्ही नेत्यांसोबत राहुल गांधी यांची स्वतंत्र चर्चा झाली असून सिद्धरामय्या यांच्याशी सुमारे अर्धा तास चर्चा केली. तर शिवकुमार त्यांच्याशी तासाभराहून अधिक वेळ चर्चा झाली असल्याचं सांगण्यात येत आहे. याचप्रमाणे काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या निवासस्थानी देखील दोन्ही नेत्यांनी खरगेची भेट घेतली.

दरम्यान, जर डी के शिवकुमार यांनी जर राहुल गांधी यांची ऑफर स्वीकारली तर सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सिद्धरामय्या यांचा शपथविधी शनिवारी किंवा रविवारी होण्याची शक्यता आहे. यामुळे डी के शिवकुमार काय निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे . तसचं खरगे यांनी सोमवारी पक्षाच्या तिन्ही निरीक्षकांशी चर्चाही केली होती. निरीक्षकांनीही त्यांच्या मताच्या आधारे आमदारांना अहवाल सादर केला होता. यावरून हा निर्णय घेण्यात आल्याचं सांगितलं जातं आहे.

महत्वाच्या बातम्या-

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
Maharashtra Desha

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही