Share

PM Kisan Yojana | पीएम किसान योजनेतील 14 व्या हप्ताबाबत मोठी अपडेट! जाणून घ्या सविस्तर

PM Kisan Yojana | टीम महाराष्ट्र देशा: प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचे 13 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यावर पोहोचले आहे. शेतकरी आता 14 व्या हप्त्याची आतुरतेने वाट बघत आहे. 14 व्या हप्त्याबाबत केंद्र सरकारच्या ऑनलाईन पोर्टलवर अपडेट दिली जात आहे. केंद्र सरकारने लहान आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यासाठी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना (PM Kisan Nidhi … Read more

Published On: 

PM Kisan Yojana | टीम महाराष्ट्र देशा: प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचे 13 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यावर पोहोचले आहे. शेतकरी आता 14 व्या हप्त्याची आतुरतेने वाट बघत आहे. 14 व्या हप्त्याबाबत केंद्र सरकारच्या ऑनलाईन पोर्टलवर अपडेट दिली जात आहे. केंद्र सरकारने लहान आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यासाठी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना (PM Kisan Nidhi Sanman Yojana) सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये दरवर्षी 6000 रुपये हस्तांतरित केले जातात. हे पैसे प्रत्येकी 2000 रुपयांच्या तीन हप्त्यांमध्ये शेतकऱ्यांच्या अकाउंटवर पाठवले जातात.

मीडिया रिपोर्टनुसार, मे किंवा जून महिन्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर या योजनेतील (PM Kisan Yojana) 14 वा हप्ता पोहचू शकतो. मात्र, अद्याप केंद्र सरकारकडून याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. सध्या केंद्र सरकार 14 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर पाठवण्याच्या तयारीत व्यस्त आहे.

27 फेब्रुवारी 2023 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या योजनेतील (PM Kisan Yojana) तेरावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर पाठवला होता. 8 कोटीहून अधिक शेतकऱ्यांना या योजनेतील तेराव्या हप्त्याचा लाभ मिळाला आहे. पंतप्रधान मोदींनी सुमारे 16800 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर पाठवले आहे. या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना केवायसी आणि कागदपत्रांची पडताळणी करून घेणे अनिवार्य आहे.

PM किसान योजना हेल्पलाईन (PM Kisan Yojana Helpline)

पीएम किसान योजनेमध्ये ((PM Kisan Yojana)) तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचणी येत असेल, तर तुम्ही सरकारची मदत घेऊ शकतात. यासाठी तुम्ही या pmkisan-ict@gov.in ईमेल आयडीवर तुमची अडचण नोंदवू शकतात. किंवा या 155261 किंवा 1800115526 (टोल फ्री) किंवा 011-23381092 हेल्पलाइन क्रमांकावर फोन करून तुम्ही तुमची तक्रार नोंदवू शकतात.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही