Share

Oily Hair | तेलकट केसांच्या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी करा ‘हे’ घरगुती उपाय

🕒 1 min readOily Hair | टीम महाराष्ट्र देशा: आजच्या काळात प्रत्येकाला सुंदर, दाट आणि चमकदार केस हवे असतात. परंतु पोषक तत्त्वांच्या अभावामुळे आणि चुकीच्या खाण्यापिण्याची सवयींमुळे केसांच्या अनेक समस्या निर्माण व्हायला लागतात. त्याचबरोबर अनेकांना तेलगट केसांचा खूप त्रास होतो. केस धुतल्यानंतर थोड्या वेळातच केस तेलकट दिसायला लागतात. त्यामुळे या तेलकट केसाच्या समस्येवर मात करण्यासाठी … Read more

Published On: 

🕒 1 min read

Oily Hair | टीम महाराष्ट्र देशा: आजच्या काळात प्रत्येकाला सुंदर, दाट आणि चमकदार केस हवे असतात. परंतु पोषक तत्त्वांच्या अभावामुळे आणि चुकीच्या खाण्यापिण्याची सवयींमुळे केसांच्या अनेक समस्या निर्माण व्हायला लागतात. त्याचबरोबर अनेकांना तेलगट केसांचा खूप त्रास होतो. केस धुतल्यानंतर थोड्या वेळातच केस तेलकट दिसायला लागतात. त्यामुळे या तेलकट केसाच्या समस्येवर मात करण्यासाठी लोक वेगवेगळे उपाय शोधत असतात. यामध्ये बहुतांश लोक बाजारामध्ये उपलब्ध असलेल्या महागड्या उत्पादनांचा वापर करतात. मात्र, ही उत्पादन केसांसाठी हानिकारक ठरू शकतात. त्यामुळे तेलकट केसांच्या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही काही घरगुती उपायांची मदत घेऊ शकतात. तेलगट केसांची समस्या दूर करण्यासाठी तुम्ही खालील घरगुती उपाय करू शकतात.

खोबरेल तेल (Coconut oil-For Oily Hair)

तेलकट केसांच्या समस्येवर मात करण्यासाठी खोबरेल तेल उपयुक्त ठरू शकते. यासाठी तुम्हाला खोबरेल तेल कोमट करून घ्यावे लागेल. साधारण दहा ते पंधरा मिनिटे मसाज केल्यानंतर तुम्हाला एक तास खोबरेल तेल केसांना राहू द्यावे लागेल. एक तासानंतर तुम्हाला तुमची केस शाम्पूने धुवावे लागतील. नियमित असे केल्याने तेलगट केसांची समस्या दूर होऊ शकते.

कोरफड (Aloevera-For Oily Hair)

कोरफडीच्या मदतीने तेलकट केसांची समस्या दूर होऊ शकते. यासाठी तुम्हाला एक कप पाण्यामध्ये कोरफडीचा गर आणि लिंबाचा रस मिसळून घ्यावा लागेल. त्यानंतर तुम्हाला या मिश्रणाने केसांना मसाज करावी लागेल. मसाज झाल्यानंतर तुम्हाला तुमचे केस सामान्य पाण्याने धुवावे लागेल. या मिश्रणाच्या मदतीने केसातील अतिरिक्त तेल निघून जाते आणि केस चमकदार होतात.

ग्रीन टी (Green tea-For Oily Hair)

ग्रीन टी केसांसाठी खूप फायदेशीर ठरू शकते. यासाठी तुम्हाला ग्रीन टीच्या दोन ते तीन बॅग्स पाण्यात उकळून घ्याव्या लागतील. त्यानंतर ते पाणी कोमट झाल्यावर साधारण अर्धा तास तुम्हाला ते केसांमध्ये लावून ठेवावे लागेल. अर्ध्या तासानंतर तुम्हाला तुमचे केस सामान्य पाण्याने धुवावे लागतील. ग्रीन टीच्या मदतीने केसातील चिकटपणा दूर होतो आणि केस चमकदार होतात.

तेलकट केसाच्या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही वरील घरगुती उपाय करू शकतात. त्याचबरोबर रेशमी आणि मऊ केस हवे असतील तर तुम्ही खाली पर्यायांचा अवलंब करू शकतात.

ॲपल व्हिनेगर (Apple Vinegar-Soften Hair)

केसांना मऊ आणि चमकदार बनवण्यासाठी तुम्ही शाम्पूमध्ये ॲपल व्हिनेगर मिसळू शकतात. ॲपल व्हिनेगरच्या वापरामुळे पीएच पातळी नियंत्रणात राहते. ॲपल व्हीनेगर शाम्पूमध्ये मिसळून केसांना लावल्याने टाळूची त्वचा तेलकट होत नाही. तुम्ही आठवड्यातून दोनदा ॲपल व्हीनेगर शाम्पूमध्ये मिसळून केसांना लावू शकतात.

कांद्याचा रस (Onion juice-Soften Hair)

केसांची काळजी घेण्यासाठी कांदा उपयुक्त ठरू शकतो. यासाठी तुम्हाला मिक्सर किंवा ग्राइंडर मध्ये कांदा बारीक करून त्यामधून रस काढून घ्यावा लागेल. त्यानंतर तुम्हाला साधारण पंधरा मिनिटे केसांना कांद्याचा रस लावून ठेवावा लागेल. कांद्यामध्ये आढळणारे अँटिऑक्सिडंट गुणधर्म केस चमकदार आणि मुलायम बनवण्यास मदत करतात.

दही (Curd-Soften Hair)

दही आपल्या केसांसाठी खूप फायदेशीर ठरू शकते. केसांवर दह्याचा वापर केल्याने केस चमकदार आणि मऊ होऊ शकतात. यासाठी तुम्हाला साधारण अर्धा तास दही केसांना लावून ठेवावे लागेल. त्यानंतर तुम्हाला तुमच्या नियमित शाम्पूने केस धुवावे लागतील. दही केसांसाठी नैसर्गिक कंडिशनर म्हणून काम करतो.

टीप: वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!