Share

Peanuts Benefits | दररोज सकाळी भिजवलेले शेंगदाणे खाल्ल्याने मिळतात ‘हे’ आरोग्यदायी फायदे

Peanuts Benefits | टीम महाराष्ट्र देशा: शेंगदाणे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. कारण शेंगदाण्यांमध्ये अनेक पोषक घटक आढळून येतात. परंतु ज्या लोकांना शेंगदाण्याची ॲलर्जी आहे, त्यांनी ते खाणे टाळावे. सुपर फूड मानल्या जाणाऱ्या शेंगदाण्यांमध्ये बदामा इतकेच पौष्टिक गुणधर्म आढळतात. शेंगदाण्यांमध्ये प्रोटीन, कॅल्शियम, फायबर, मॅग्नेशियम, पोटॅशियम, विटामिन ई इत्यादी गुणधर्म भरपूर प्रमाणात आढळून येतात. त्याचबरोबर यामध्ये … Read more

Published On: 

Peanuts Benefits | टीम महाराष्ट्र देशा: शेंगदाणे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. कारण शेंगदाण्यांमध्ये अनेक पोषक घटक आढळून येतात. परंतु ज्या लोकांना शेंगदाण्याची ॲलर्जी आहे, त्यांनी ते खाणे टाळावे. सुपर फूड मानल्या जाणाऱ्या शेंगदाण्यांमध्ये बदामा इतकेच पौष्टिक गुणधर्म आढळतात. शेंगदाण्यांमध्ये प्रोटीन, कॅल्शियम, फायबर, मॅग्नेशियम, पोटॅशियम, विटामिन ई इत्यादी गुणधर्म भरपूर प्रमाणात आढळून येतात. त्याचबरोबर यामध्ये झिंक, सेलेनियम आणि कॉपर देखील भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे दररोज सकाळी भिजवलेल्या शेंगदाण्याचे सेवन करणे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते. रात्री पाण्यात भिजवून ठेवलेल्या शेंगदाण्याचे सकाळी सेवन केल्याने आरोग्याला अनेक पुढील मिळू शकतात.

पचन संस्था निरोगी राहते

रात्री भिजवून ठेवलेल्या शेंगदाण्याचे सकाळी सेवन केल्याने पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. त्याचबरोबर भिजवलेले शेंगदाणे खाल्ल्याने पोटाच्या अनेक समस्या दूर होऊ शकतात. त्यामुळे तुम्ही जर पोटाच्या कुठल्याही प्रकारच्या समस्येपासून त्रस्त असाल, तर तुम्ही भिजवलेल्या शेंगदाण्याचे सेवन केले पाहिजे.

हृदयासाठी फायदेशीर असते

शेंगदाण्यामध्ये हेल्दी फॅट भरपूर प्रमाणात आढळून येतात. त्याचबरोबर भिजवलेले शेंगदाणे कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यास मदत करतात. त्यामुळे मेटाबोलिझम वाढते आणि ब्लड सर्क्युलेशन सुधारण्यास मदत होते. परिणामी हृदयाला पुरेसे पोषण मिळते आणि ते निरोगी राहते.

स्नायू मजबूत होतात

भिजवलेले शेंगदाणे खाल्ल्याने स्नायूंच्या विकासाला चालना मिळू शकते. कारण यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन आढळून येते. 100 ग्राम शेंगदाण्यांमध्ये सुमारे 25 ग्रॅम प्रोटीन आढळून येते. त्यामुळे भिजवलेल्या शेंगदाण्याचे सेवन करणे तुमच्या स्नायूसाठी फायदेशीर ठरू शकते.

त्वचा आणि केसांसाठी फायदेशीर असते

भिजवलेल्या शेंगदाण्याच नियमित सेवन केल्याने त्वचा आणि केस निरोगी राहू शकतात. कारण यामध्ये अनेक पोषक तत्वे उपलब्ध आहेत, जे त्वचा आणि केस निरोगी ठेवू शकतात. त्यामुळे केस आणि त्वचेची काळजी घेण्यासाठी तुम्ही दररोज सकाळी भिजवलेल्या शेंगदाण्याचे सेवन केले पाहिजे.

टीप: वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही