Share

Skin Care | चेहऱ्यावर नैसर्गिक पद्धतीने चमक वाढण्यासाठी सफरचंदाचा ‘या’ पद्धतीने करा वापर

Skin Care | टीम महाराष्ट्र देशा: सफरचंद (Apple) आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. त्याचबरोबर सफरचंद आपल्या त्वचेसाठी देखील उपयुक्त ठरू शकते. सफरचंदामध्ये कॅल्शियम, सोडियम, फॉस्फरस, आयरन आणि विटामिन सी आढळून येते. हे गुणधर्म रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतात. त्यामुळे तज्ञ ही दररोज एक सफरचंद खाण्याचा सल्ला देतात. सफरचंद खाल्ल्याने शरीर निरोगी राहते त्याबरोबर त्वचेला अनेक … Read more

Published On: 

Skin Care | टीम महाराष्ट्र देशा: सफरचंद (Apple) आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. त्याचबरोबर सफरचंद आपल्या त्वचेसाठी देखील उपयुक्त ठरू शकते. सफरचंदामध्ये कॅल्शियम, सोडियम, फॉस्फरस, आयरन आणि विटामिन सी आढळून येते. हे गुणधर्म रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतात. त्यामुळे तज्ञ ही दररोज एक सफरचंद खाण्याचा सल्ला देतात. सफरचंद खाल्ल्याने शरीर निरोगी राहते त्याबरोबर त्वचेला अनेक फायदे मिळतात. त्वचेवरील समस्या दूर करण्यासाठी तुम्ही पुढील प्रमाणे सफरचंदाचा वापर करू शकतात.

सफरचंद आणि दही

चेहऱ्यावर सफरचंद लावण्यासाठी तुम्हाला एक सफरचंद व्यवस्थित बारीक करून घ्यावा लागेल. सफरचंद व्यवस्थित बारीक झाल्यानंतर त्यामध्ये एक चमचा दही आणि दोन थेंब लिंबाचा रस मिसळून घ्यावा लागेल. हे मिश्रण व्यवस्थित तयार झाल्यावर तुम्हाला ते दहा मिनिटे चेहऱ्यावर लावून ठेवावे लागेल. त्यानंतर तुम्हाला तुमचा चेहरा सामान्य पाण्याने धुवावा लागेल.

सफरचंद आणि मध

सफरचंदामध्ये उपलब्ध असलेले घटक त्वचेच्या अनेक समस्या सहज दूर करण्यास मदत करतात. त्याचबरोबर सफरचंद आणि मधाच्या मदतीने तुम्ही चेहऱ्याची नैसर्गिक पद्धतीने काळजी घेऊ शकतात. यासाठी तुम्हाला एक सफरचंद किसून त्यामध्ये एक चमचा मध मिसळून घ्यावा लागेल. त्यानंतर तयार झालेले हे मिश्रण तुम्हाला दहा ते पंधरा मिनिटे चेहऱ्यावर लावून ठेवावे लागेल. दहा ते पंधरा मिनिटानंतर तुम्हाला तुमचा चेहरा सामान्य पाण्याने धुवावा लागेल.

सफरचंद आणि ग्लिसरीन

तुम्ही जर कोरड्या त्वचेच्या समस्येपासून त्रस्त असाल तर तुमच्यासाठी सफरचंद आणि ग्लिसरीन उपयुक्त ठरू शकते. त्यासाठी तुम्हाला एक सफरचंद किसून त्यामध्ये एक चमचा ग्लिसरीन आणि गुलाब जल मिसळून घ्यावे लागेल. तयार झालेले हे मिश्रण तुम्हाला दहा मिनिटे चेहऱ्यावर लावून ठेवावे लागेल. त्यानंतर तुम्हाला तुमचा चेहरा सामान्य पाण्याने धुवावा लागेल. या मिश्रणाचा वापर केल्याने कोरड्या त्वचेची समस्या दूर होऊ शकते.

टीप: वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही