Share

Milk Benefits | शरीर निरोगी आणि तंदुरुस्त ठेवण्यासाठी दुधामध्ये ‘या’ गोष्टी प्या मिसळून

Milk Benefits | टीम महाराष्ट्र देशा: दूध आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. दुधामध्ये कॅल्शियम, प्रोटीन, फॉस्फरस, मॅग्नेशियम, विटामिन इत्यादी पोषक घटक आढळून येतात. दूध प्यायल्याने हाडे मजबूत होतात. त्याचबरोबर दुधाचे नियमित सेवन केल्याने पचनक्रिया चांगली राहते आणि बद्धकोष्ठतेची समस्या सहज दूर होते. दूध शरीराला दीर्घकाळ निरोगी ठेवण्यास मदत करते. अनेक लोक निरोगी राहण्यासाठी दुधामध्ये वेगवेगळ्या … Read more

Published On: 

Milk Benefits | टीम महाराष्ट्र देशा: दूध आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. दुधामध्ये कॅल्शियम, प्रोटीन, फॉस्फरस, मॅग्नेशियम, विटामिन इत्यादी पोषक घटक आढळून येतात. दूध प्यायल्याने हाडे मजबूत होतात. त्याचबरोबर दुधाचे नियमित सेवन केल्याने पचनक्रिया चांगली राहते आणि बद्धकोष्ठतेची समस्या सहज दूर होते. दूध शरीराला दीर्घकाळ निरोगी ठेवण्यास मदत करते. अनेक लोक निरोगी राहण्यासाठी दुधामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्रोटीन पावडर मिसळून त्याचे सेवन करतात. मात्र त्याचे अति सेवन करणे शरीरासाठी हानिकारक ठरू शकते. त्यामुळे तुम्ही दुधात घरात उपलब्ध असलेल्या काही गोष्टी मिसळून पिऊ शकतात. या गोष्टीचे सेवन केल्याने शरीराला अनेक फायदे मिळू शकतात. दुधामध्ये पुढील गोष्टी मिसळून प्यायल्याने शरीराला अनेक फायदे मिळू शकतात.

बदाम

बदाम हा पोषक तत्वांचा खजिना आहे. बदामामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन, फायबर, आयरन आणि विटामिन आढळून येते. बदामाचे दूध प्यायल्याने हाडे मजबूत होतात आणि रोगप्रतिकारशक्ती देखील मजबूत होते. रात्री तीन ते चार बदाम भिजवून ठेवावे आणि ते सकाळी दुधात मिसळून प्यावे. नियमित दुधात बदाम मिसळून प्यायल्याने शरीराला अनेक फायदे मिळू शकतात.

मध

दुधामध्ये मध मिसळून प्यायल्याने शरीरातील अनेक समस्या दूर होऊ शकतात. कारण मधामध्ये कार्बोहायड्रेट्स, ग्लुकोज आणि विटामिन सी आढळून येते. हे गुणधर्म शरीराची प्रतिकारशक्ती आणि ऊर्जा वाढवण्यास मदत करते. सकाळी दुधामध्ये मध मिसळून प्यायल्याने दिवसभर मूड फ्रेश राहतो.

गुळ

गुळ आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानला जाते. दररोज सकाळी दुधात गूळ मिसळून प्यायल्याने स्नायू मजबूत होतात आणि शरीर निरोगी राहते. त्याचबरोबर नियमित या दुधाचे सेवन केल्याने त्वचाही निरोगी राहते. त्यामुळे त्वचेची काळजी घेण्यासाठी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी तुम्ही सकाळी गुळाच्या दुधाचे सेवन करू शकतात.

टीप: वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही