Share

Job Recruitment | इंडियन पोस्ट महाराष्ट्र विभागामध्ये ‘या’ पदांच्या भरती प्रक्रियेसाठी जाहिरात प्रसिद्ध

Job Recruitment | टीम महाराष्ट्र देशा: सरकारी नोकरी शोधत असलेल्या उमेदवारांसाठी भारत सरकार नोकरीची संधी उपलब्ध करून देत आहे. भारत सरकारच्या पोस्टल विभाग (महाराष्ट्र) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या पदांसाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतील. या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहिती मिळवण्यासाठी इच्छुक उमेदवार http://www.indiapost.gov.in … Read more

Published On: 

Job Recruitment | टीम महाराष्ट्र देशा: सरकारी नोकरी शोधत असलेल्या उमेदवारांसाठी भारत सरकार नोकरीची संधी उपलब्ध करून देत आहे. भारत सरकारच्या पोस्टल विभाग (महाराष्ट्र) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या पदांसाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतील. या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहिती मिळवण्यासाठी इच्छुक उमेदवार http://www.indiapost.gov.in या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात.

भारत सरकारच्या पोस्टल विभागाच्या या भरती प्रक्रियेमध्ये तब्बल 2508 रिक्त पदे भरण्यात येणार आहे. या पदांमध्ये ग्रामीण डाक सेवक (GDS) (शाखा पोस्टमास्टर (BPM)/ सहायक शाखा पोस्टमास्टर (ABPM)/ डाक सेवक) पदांच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहे.

या भरती प्रक्रियेसाठी इच्छुक उमेदवार किमान इयत्ता दहावी उत्तीर्ण असावा. या पदांच्या शैक्षणिक पात्रतेबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी पदानुसार इच्छुक उमेदवार http://www.indiapost.gov.in या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात.

भारत सरकारच्या या भरती प्रक्रियेसाठी इच्छुक उमेदवार दिनांक 16 फेब्रुवारी 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतील. या भरती प्रक्रियेबद्दल सविस्तर माहिती मिळवण्यासाठी इच्छुक उमेदवार http://www.indiapost.gov.in या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही