Sanjay Raut | “आमच्या कामावर शिक्कामोर्तब करताय”; पंतप्रधान मोदींच्या मुंबई दौऱ्यावरुन राऊतांनी डिवचलं

Sanjay Raut | मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या मुंबईच्या एकदिवसीय दौऱ्यावर आहेत. या निमित्ताने वांद्रे येथील बी.के.सी. मैदानावर भाजप आणि शिंदे गटाने त्यांची जाहीर सभा आयोजित केली आहे. या सभेला दीड लाख लोक येणार आहेत. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईतील विविध विकास कामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण करणार आहेत. या लोकार्पणाच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी … Read more

Published On: 

Sanjay Raut | मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या मुंबईच्या एकदिवसीय दौऱ्यावर आहेत. या निमित्ताने वांद्रे येथील बी.के.सी. मैदानावर भाजप आणि शिंदे गटाने त्यांची जाहीर सभा आयोजित केली आहे. या सभेला दीड लाख लोक येणार आहेत. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईतील विविध विकास कामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण करणार आहेत. या लोकार्पणाच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबई महापालिका निवडणुकीचे रणशिंगच फुंकणार असल्याचे सांगितले जात आहे.

“पंतप्रधानांच्या दौऱ्याला अवघे काही तास बाकी असतानाच ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी भाजपला डिवचले आहे. पंतप्रधान मोदी उद्या शिवसेनेने केलेल्या कामांवरच शिक्कामोर्तब करणार, आनंद आहे”, असे संजय राऊत यांनी म्हणाले आहे.

“पंतप्रधान ज्या कामांचे लोकार्पण करण्यासाठी येणार आहेत, त्यातील बरीचशी कामे शिवसेनेने सुरू केली होती. शिवसेनेने केलेल्या कामाच्या पायभरणीचे लोकापर्ण होणार आहे. याचा अर्थ आमच्या कामावर शिक्कामोर्तब करण्यात येत आहे”, असा चिमटाही खासदार संजय राऊत यांनी भाजपला काढला आहे.

“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेहमीच स्वागत आहे. मोदी ज्या योजनांच्या उद्घाटनासाठी येत आहेत त्या कामाची सुरुवात आम्ही केली. शिवसेनेने जी कामे केली, त्याचे लोकार्पण होत आहे. पंतप्रधानांनी यावे. मुंबई, महाराष्ट्र आणि हा देश सर्वांचा आहे”, असे संजय राऊत म्हणाले आहे.

महत्वाच्या बातम्या 

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही