🕒 1 min read
Walmik Karad । मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांचे अपहरण करून खून करण्यात आला. याप्रकरणी वाल्मिक कराडने शरण आला आहे. पण अजूनही काही आरोपींना पकडण्यात यश आले नाही. अशातच आता वाल्मिक कराड याने मोठी मागणी केली आहे. (Santosh Deshmukh murder)
आपल्याला मदतनीस मिळावा यासाठी वाल्मिक कराड याने न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे. आपल्याला स्लीप ॲप्निया या नावाचा आजार असल्याचा दावा कराड याने न्यायालयात केला आहे. या आजारासाठी ऑक्सिजन मशीन दररोज लावण्याची गरज असते. विशेष म्हणजे या आजारात ऑटो सीपॅप ही मशीन झोपताना लावावी लागते.
त्यामुळे ही मशीन चालवण्यासाठी एक मदतनीस 24 तास गरजेचा असतो. त्यासाठी त्याने न्यायालयाकडे मदतनीस मिळावा विनंती केली होती. सुनावणीअंती न्यायालयाने शासकीय वैद्यकीय सुविधा पुरवण्याविषयी सुचवल्याची माहिती समोर आली आहे.
Walmik Karad Demand
दरम्यान, सुदर्शन घुले (Sudarshan Ghule), कृष्णा आंधळे, सुधीर सांगळेला फरार घोषित केले आहे. पोलिसांची 7 पथकं राज्यासह देशभर सुदर्शन घुलेच्या मागावर असून फरार आरोपींना पकडून देणा-यास पोलिसांनी बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. याबाबत स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षकांकडून प्रसिद्धीपत्रक जारी केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
- Walmik Karad । सर्वात मोठी बातमी! ‘त्या’ कबुलीने वाढल्या वाल्मिक कराडच्या अडचणी, जाणून घ्या नेमकं प्रकरण
- Walmik Karad थांबला ते घर कुणाचं? गाडीत आलेले ‘ते’ लोक कोण? बड्या खासदाराची मोठी मागणी
- Walmik Karad ला पोलिसांची मदत, संतोष देशमुख यांच्या भावाचा गंभीर आरोप
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now










