Share

Uddhav Thackeray | ठाकरे-शिंदे पुन्हा येणार आमने-सामने! एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरेंचा मेळावा

🕒 1 min readUddhav Thackeray | ठाणे: आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व पक्ष तयारीला लागले आहे. निवडणुका लक्षात घेत सर्व पक्ष मेळावे  आणि बैठका घेत आहेत. याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात म्हणजेच ठाण्यामध्ये मेळावा घेणार आहेत. उद्धव ठाकरेंच्या या मेळाव्याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहणार आहे. A gathering of North Indians has been … Read more

Published On: 

🕒 1 min read

Uddhav Thackeray | ठाणे: आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व पक्ष तयारीला लागले आहे. निवडणुका लक्षात घेत सर्व पक्ष मेळावे  आणि बैठका घेत आहेत. याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात म्हणजेच ठाण्यामध्ये मेळावा घेणार आहेत. उद्धव ठाकरेंच्या या मेळाव्याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहणार आहे.

A gathering of North Indians has been organized by the Thackeray group

ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे ठाकरे गटाकडून उत्तर भारतीयांच्या मेळाव्याचं आयोजन करण्यात आले आहे. ठाकरे गट या मेळाव्याच्या माध्यमातून मराठी मतदारांसोबतच उत्तर भारतीय मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहे. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे स्वतः या मेळाव्याला संबोधित करणार आहे.

दरम्यान, ठाकरे गटानं 16 आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय लवकरात लवकर व्हावा यासाठी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. ठाकरे गटाच्या या याचिकेवर आज (14 जुलै) सुनावणी होणार आहे.  सुप्रीम कोर्ट विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना काय आदेश देतील? याकडं सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

गेल्या काही दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने शिंदे गटातील 16 आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय घेण्याचा अधिकार विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर सोपवला होता.

मात्र, कोर्टाने त्यांना हा निर्णय घेण्यासाठी कोणत्याही प्रकारची वेळ ठरवून दिली नव्हती. त्यामुळे नार्वेकरांनी लवकरात लवकर निर्णय घ्यावा अशी मागणी ठाकरे गटाकडून करण्यात आली होती.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!