प्रतिनिधी, 7 ऑक्टोबर: सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या सुनावणीत न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची यांनी घटनात्मक पापाबाबत महत्त्वपूर्ण टिप्पणी केली आहे. न्यायमूर्ती बागची यांनी शिंदे गटाचे वकील नीरज कौल यांना विचारले की, पक्ष चिन्हाचे महत्त्व घटनात्मक पाप करणाऱ्यांसाठी लागू होईल की त्या पापाविरोधात तक्रार करणाऱ्यांसाठी. या टिप्पणीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी समाधान व्यक्त केले आहे.
फुटीरांना आणि घटनेशी द्रोह करणाऱ्यांना पक्ष आणि चिन्ह कसे दिले जाऊ शकते, यावर न्यायमूर्ती बागची यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याचा दावा संजय राऊत यांनी केला. तसेच, ही सुनावणी योग्य दिशेने सुरू असून धनुष्यबाण योग्य ठिकाणी दिला जाईल आणि याचा पारदर्शक निकाल लागेल, अशी आशा राऊत यांनी व्यक्त केली.
याचबरोबर राऊत यांनी आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरूनही सरकारला लक्ष्य केले. नाशिकमध्ये काही महिन्यांपासून आंदोलन करणारे आदिवासी विद्यार्थी आपल्या मागण्यांसाठी मुंबईत आले होते व राहायला जागा नसल्याने ते टिळक भवनात थांबले होते. मात्र, देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशावरून या विद्यार्थ्यांना टिळक भवनातून फरफटत बाहेर काढण्यात आले आणि मुंबईच्या वेशीवर नेण्यात आले, असा आरोप राऊत यांनी केला. या विद्यार्थ्यांची व्यवस्था सह्याद्री अतिथीगृह, आमदार निवास किंवा एखाद्या हॉटेलमध्ये करायला हवी होती, असे मत त्यांनी मांडले.
दरम्यान, रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरही राऊत यांनी भाष्य केले. एमपीएससी आणि आदिवासी विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन लढा देण्याचे आवाहन त्यांनी केले. विरोधी पक्षनेत्यांप्रमाणेच मुख्यमंत्री आणि राज्यपालांनीही आंदोलनाच्या ठिकाणी जाऊन विद्यार्थ्यांची भेट घ्यावी, अशी मागणी राऊत यांनी केली. तसेच, आंदोलक विद्यार्थ्यांमध्ये फूट पाडण्याऐवजी फडणवीस यांनी थेट त्यांच्याशी संवाद साधावा, अशी टीकाही त्यांनी केली.
📌 महत्वाच्या बातम्या
- MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर उच्च न्यायालयाची महत्त्वाची टिप्पणी; राज्य सरकारला ३ आठवड्यांत आराखडा सादर करण्याचे निर्देश
- ‘काळ्याकुट्ट भुवया घेऊन.. अगं बाई तू ये’ रोहिणी खडसे आणि चित्रा वाघ यांच्यात वैयक्तिक पातळीवर आरोप-प्रत्यारोप
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तातडीने दिल्लीला रवाना; केंद्रात नवी जबाबदारी मिळणार असल्याच्या चर्चांना उधाण
Quick Answers
न्यायमूर्ती बागची यांनी शिंदे गटाचे वकील नीरज कौल यांना पक्ष चिन्हाचे महत्त्व घटनात्मक पाप करणाऱ्यांसाठी लागू होईल की त्या पापाविरोधात तक्रार करणाऱ्यांसाठी, असा प्रश्न विचारला.
न्यायमूर्तींच्या या टिप्पणीवर संजय राऊत यांनी समाधान व्यक्त केले. ही सुनावणी योग्य दिशेने सुरू असून धनुष्यबाण योग्य ठिकाणी दिला जाईल आणि याचा पारदर्शक निकाल लागेल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशावरून टिळक भवनात थांबलेल्या आदिवासी विद्यार्थ्यांना फरफटत बाहेर काढण्यात आले आणि मुंबईच्या वेशीवर नेण्यात आले, असा आरोप संजय राऊत यांनी केला.
संजय राऊत यांनी एमपीएससी आणि आदिवासी विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन लढा देण्याचे आवाहन केले. तसेच, विरोधी पक्षनेत्यांप्रमाणेच मुख्यमंत्री आणि राज्यपालांनीही आंदोलनाच्या ठिकाणी जाऊन विद्यार्थ्यांची भेट घ्यावी, अशी मागणी त्यांनी केली.
टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.
Ask Maharashtra Desha
आधी महाराष्ट्र देशाच्या उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.








