Share

Sanjay Raut | “मला फडणवीसांची कीव येते, देवाने त्यांना…”; संजय राऊतांचा फडणवीसांना खोचक टोला

🕒 1 min readSanjay Raut | मुंबई: ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत नेहमी सत्ताधाऱ्यांवर टीकास्त्र चालवत असतात. आज माध्यमांशी बोलत असताना संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची मला दया येते. देवानं लवकरच त्यांना या संकटातून सोडवावं, असा खोचक टोला राऊतांनी आणि फडणवीसांना लगावला आहे. Sanjay Raut criticizes … Read more

Published On: 

🕒 1 min read

Sanjay Raut | मुंबई: ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत नेहमी सत्ताधाऱ्यांवर टीकास्त्र चालवत असतात. आज माध्यमांशी बोलत असताना संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची मला दया येते. देवानं लवकरच त्यांना या संकटातून सोडवावं, असा खोचक टोला राऊतांनी आणि फडणवीसांना लगावला आहे.

Sanjay Raut criticizes Devendra Fadnavis

माध्यमांशी बोलताना संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले, “उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सध्या काय जबाबदारी आहे? काय माहित? आमच्यासोबत असताना ते उत्तम विरोधी पक्ष नेते होते. त्यानंतर ते मुख्यमंत्री पदावर विराजमान झाले. सध्या ते उपमुख्यमंत्री पदावर आहे. अशात काल ते फुटलेल्या गटाची गाडी चालवत होते, केंद्राने त्यांच्यावर काय जबाबदारी टाकली आहे, हे बघावं लागेल.

पुढे बोलताना ते (Sanjay Raut) म्हणाले, “देवेंद्र फडणवीस फार चांगला माणूस आहे. मला त्यांची दया आणि कीव येते. देवानं लवकरच त्यांना या संकटातून सोडवावं अशी मी प्रार्थना करतो.”

“तुम्ही बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून दिला नाही. तुमचं सरकार शेतकरी, कष्टकरी आणि बेरोजगारांसाठी काम करण्यास अपयशी ठरलं आहे. नक्षलवादाचा विचार समजून घ्या. तुम्ही लोकांना खोट्या प्रकरणात अडकवून दहशतवादी आणि आर्थिक दहशतवादी ठरवत आहात,” असंही राऊत (Sanjay Raut) बोलताना म्हणाले.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!