नाना पाटेकरांना होती लोकसभेची ऑफर; आदरांजली सभेत आशिष शेलारांनी सांगितला फडणवीसांसोबतच्या भेटीचा किस्सा

ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या आदरांजली सभेत मंत्री आशिष शेलार यांनी नानांना लोकसभेची ऑफर दिली होती, असा मोठा खुलासा केला आहे.

Published On: 

MHD LOGO

प्रतिनिधी, 14 ऑक्टोबर: ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी रवींद्र नाट्यमंदिर येथे ‘आठवणीतले नाना’ या आदरांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेमध्ये मंत्री आशिष शेलार यांनी नानांच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू उलगडले. यावेळी त्यांनी नाना पाटेकर यांना लोकसभेची निवडणूक लढवण्याची ऑफर दिली होती, असा महत्त्वपूर्ण खुलासा केला.

या प्रस्तावावर चर्चा करण्यासाठी नाना पाटेकर यांनी देवेंद्र फडणवीस आणि आशिष शेलार यांची भेट घेतली होती. नानांचा स्वभाव अत्यंत स्पष्टवक्ता असल्याने ते मनात असेल ते थेट बोलून दाखवायचे. याच भेटीत नानांनी आपल्या खास शैलीत, ‘मी तुम्हाला पचणार नाही,’ असे स्पष्ट उत्तर दिल्याची आठवण शेलार यांनी सांगितली.

नाना पाटेकर यांच्यासोबत झालेल्या अलीकडच्या संवादाची माहिती देताना शेलार म्हणाले की, ६ ऑक्टोबर रोजी नानांनी ‘माझा उपयोग करा रे’ असे म्हटले होते. या शब्दांतून त्यांची समाजासाठी काम करण्याची तळमळ दिसून येत होती. त्यानंतर शेलार यांनी फोनवरून विचारणा केली असता, आपण ९ ऑक्टोबरला मुंबईत येणार असल्याचे नानांनी सांगितले होते.

बाप्पानिमित्त नाना पाटेकर यांना प्रमाणपत्र द्यायचे असल्याने ९ ऑक्टोबर रोजी एका कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले होते. मात्र, त्यापूर्वीच ८ ऑक्टोबरला नाना पाटेकर आपल्यातून निघून गेले आणि नियोजित भेट होऊ शकली नाही, असा प्रसंग शेलार यांनी विषद केला.

नानांचे मोकळेपण आणि संवादाची शैली सांगताना शेलार यांनी आणखी एक प्रसंग सांगितला. नाना कधी रागात बोलायचे, तर कधी थेट भूमिका मांडायचे, पण मनाने ते वेगळे होते. एका शोकसभेदरम्यान नानांनी आपल्याला, ‘तू जास्तच बोलला रे,’ असे म्हटले होते, यातून त्यांच्या मोकळ्या आणि मिश्किल स्वभावाची ओळख होते, असे शेलार यांनी नमूद केले.

📌 महत्वाच्या बातम्या

Quick Answers

ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी रवींद्र नाट्यमंदिर येथे ‘आठवणीतले नाना’ या आदरांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते.

टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.

AI-assisted · Powered by Gemini
AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
हेही विचारू शकता
Maharashtra Desha

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही