‘नटसम्राट’च्या शूटिंगवेळी नाना काकांनी मला रट्ट्कन फटका मारला; मृण्मयी देशपांडेकडून किस्सा उलगडला

‘नटसम्राट’ सिनेमाच्या शूटिंगदरम्यान नाना पाटेकर यांनी आपल्याला रट्ट्कन फटका मारला होता, असा गमतीशीर किस्सा अभिनेत्री मृण्मयी देशपांडे हिने एका जुन्या मुलाखतीत सांगितला आहे.

Published On: 

MHD LOGO

प्रतिनिधी, 14 ऑक्टोबर: सुप्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांचे वयाच्या ७५ व्या वर्षी गोव्यात हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. यानंतर अनेक कलाकारांनी शोक व्यक्त करत त्यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. याच पार्श्वभूमीवर अभिनेत्री मृण्मयी देशपांडे हिची 'दूरदर्शन'ला दिलेली एक जुनी मुलाखत व्हायरल होत असून, त्यात तिने 'नटसम्राट' चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानचा अनुभव शेअर केला आहे.

आजही आवर्जून पाहिल्या जाणाऱ्या आणि प्रचंड गाजलेल्या 'नटसम्राट' या सिनेमात मृण्मयीने नाना पाटेकर यांच्या मुलीची भूमिका साकारली होती. या चित्रपटातील एका दृश्यामध्ये, नवऱ्याचे हरवलेले पैसे वडिलांनीच घेतले असावेत या संशयावरून ती नानांची खोली आणि ट्रंक तपासायला जाते.

या सीनच्या चित्रीकरणावेळी ट्रंकेत नेमकं काय आहे, हे बघण्याची मृण्मयीला उत्सुकता होती. पहिल्यांदा जेव्हा हा सीन केला, तेव्हा तिने ट्रंकेत काय आहे असे विचारले. त्यावर नाना काकांनी तिला रट्ट्कन फटका मारला. त्यांचा हात लागल्याने आपण ‘ऊई ऊई’ करायला लागल्याचे मृण्मयीने या मुलाखतीत सांगितले.

यावर नाना पाटेकर तिला म्हणाले होते की, "इथे हात कशाला वापरायला पाहिजे? सगळा हातांनी अभिनय करणार आहेस का?" याबद्दल बोलताना मृण्मयी म्हणाली की, या सिनेमात हालचालींमधूनच गोष्टी लक्षात येतात. पुढच्या सीनमध्ये तिला ट्रंकेत काय आहे हे पुन्हा बघायचे होते, मात्र तो फटका पुन्हा परवडणारा नसल्याने तिने आपला हात मागेच घेतला.

१ जानेवारी २०१६ रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात नाना पाटेकर आणि मृण्मयी देशपांडे यांच्यासह मेधा मांजरेकर, विक्रम गोखले, अजित परब, सुनील बर्वे आणि नेहा पेंडसे यांनीही महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत.

📌 महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
Maharashtra Desha

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही