MPSC Recruitment | MPSC यांच्यामार्फत ‘या’ पदांच्या 673 फक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया सुरू

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

MPSC Recruitment | टीम महाराष्ट्र देशा: राज्य शासनासोबत नोकरी करण्याची संधी शोधत असलेल्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण महाराष्ट्र लोकसेवा आयोग एमपीएससी (Maharashtra Public Service Commission MPSC) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण 673 रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया राबविली जात आहे. या भरती प्रक्रियेसाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. अधिसूचनेत दिलेल्या पदांसाठी पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या पदांसाठी इच्छुक उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.

एमपीएससी यांच्यामार्फत (MPSC Recruitment) सुरू करण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेमध्ये विविध पदांच्या एकूण 673 रिक्त जागा भरण्यात येणार आहे. यामध्ये सहायक संचालक, महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा, गट-अ, उद्योग अधिकारी (तांत्रिक), गट-ब, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी, गट-अ,स्थापत्य अभियांत्रिकी सेवा, महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवा आणि अन्न व औषध प्रशासकीय सेवेतील पदाच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहे.

या भरती प्रक्रियेतील (MPSC Recruitment) शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, वेतन, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत इत्यादी गोष्टींबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात किंवा खाली दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून बघू शकतात.

महत्त्वाच्या तारखा (Important Dates)

राज्य शासनाच्या या भरती प्रक्रियेसाठी (MPSC Recruitment) इच्छुक उमेदवार दिनांक 2 मार्च 2023 पासून ते दिनांक 22 मार्च 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. या भरती प्रक्रियेमध्ये अर्ज करण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या लिंकला भेट देऊ शकतात.

जाहिरात पाहा (View ad)

https://drive.google.com/file/d/1ArsWQ1hZNhR_SWLLfCk3_b4aXce6pOcO/view

अधिकृत वेबसाईट (Official website)

https://mpsc.gov.in/

ऑनलाइन अर्ज करा (Apply online)

https://mpsconline.gov.in/candidate

महत्वाच्या बातम्या