Shivsena | आजच्या सुनावणीत ठाकरे गटाचा मोठा युक्तीवाद; ‘या’ महत्वाच्या मुद्द्यावरुन चर्चा

Shivsena | नवी दिल्ली : सलग तिसऱ्या आठवड्यातही राज्यातील सत्तासंघर्षाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात (Supreme court) सुरू आहे. ठाकरे गटाचे वकिल अभिषेक मनूसिंघवी (Adv Abhishek Manu Singhavi) यांच्याकडून सुनावणी सुरू झाल्यानंतर युक्तिवाद करण्यात येत आहे. यामध्ये युक्तिवाद करत असतांना सिंघवी यांच्याकडून थेट राज्यपाल यांनीच कसे चुकीचे पत्र दिले होते त्याचाही दाखल दिला आहे.

मनू सिंघवींचा मोठा युक्तीवाद

ठाकरे गटाचे वकील अभिषेक मनूसिंघवी यांनी युक्तिवाद करत असतांना राज्यपालांनी बहुमत चाचणी कशी काय घेतली? अपात्रतेचा मुद्दा न्यायालयात असतांना राज्यपाल यांनी बहुमत चाचणी घेतली ती कायदेशीर नाही असा एक युक्तिवाद करण्यात आला. राज्यपाल यांना बहुमत चाचणी घेण्याचा अधिकार नव्हता, त्याबाबत न्यायालयाने निर्णय घ्यायला हवा होता. त्यामुळे विभाजणाला देखील राज्यपाल यांना निर्णय घेता येत नाही तो निर्णय न्यायालयाने घ्यायचा होता असेही मनूसिंघवी यांच्याकडून युक्तिवाद करण्यात आला आहे.

Manu singhavi big argument on Governor

मनूसिंघवी यांच्याकडून अरुणाचल येथील रेबिया प्रकरणाचा दाखला देण्यात आला आहे. त्याचे सकारात्मक आणि नकारात्मक असे दोन्ही परिणाम होऊ शकतात असेही ते म्हणाले. यावेळी मनूसिंघवी यांनी युक्तिवाद करत असतांना ’27 जुलैची परिस्थिती तशीच ठेवा म्हणत जुन्या अध्यक्षांना परत आणा’ अशी मागणी केली आहे.

पक्षांतर बंदी कायद्याच्या तरतुदीचे वाचन

राज्यपाल यांनी उद्धव ठाकरे यांना ‘तुम्ही म्हणजे शिवसेना नाही’ असे पत्र लिहिले होते. शिंदे गट हीच शिवसेना असल्याचे पत्र राज्यपाल यांनी लिहिले असल्याचा मोठा युक्तिवाद यावेळी करण्यात आला. त्यामुळे राज्यपाल यांचा पत्रव्यवहारच रद्द ठरवावा अशी मागणी यावेळी करण्यात आली. अभिषेक मनु सिंघवी यांनी पक्षांतर बंदी कायद्याच्या तरतुदीचे वाचन करत श्रीमंत पाटील केसचा दाखला देण्यात आला आहे. यावेळी जुन्या अध्यक्षांची मागणी करत परिस्थिती पुन्हा जैसे थे करा अशी मागणी करण्यात आली आहे.

महत्वाच्या बातम्या-

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.