बीड, 20 ऑक्टोबर: बीड जिल्ह्यातील ‘धाकटी पंढरी’ अशी ओळख असलेल्या नारायण गडावर मनोज जरांगे पाटील यांचा दसरा मेळावा पार पडला. या मेळाव्यातून जरांगे यांनी विविध विषयांवर भाष्य करताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर ५०० कोटी रुपयांच्या व्यवहाराबाबत खळबळजनक आरोप करत थेट आव्हान दिले आहे.
एकनाथ शिंदे यांनी दिल्लीतील भाजप नेत्यांना खोटी माहिती दिल्याचा दावा जरांगे यांनी केला आहे. ‘तुम्ही भाजपकडून ५०० कोटी रुपये आणले आणि ते श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून मला दिले, असे भाजप नेत्यांना सांगितले का?’ असा थेट सवाल जरांगे यांनी विचारला आहे. दिल्लीत याबाबत भाजपचे नेते कुजबुजत असल्याचेही ते म्हणाले.
‘तुम्ही मला ५०० कोटी दिले का? जर दिले नसतील तर भाजप नेमकं तुम्हाला संपवतंय की मला संपवतंय? याचा छडा मी लावल्याशिवाय गप्प बसणार नाही,’ असा इशारा जरांगे यांनी दिला. तसेच, आजच्या दसरा मेळाव्यातून संध्याकाळपर्यंत किंवा उद्या सकाळपर्यंत यावर उत्तर देण्याचे आव्हान त्यांनी एकनाथ शिंदे यांना दिले. ‘जर मी उद्या सकाळी मराठा समाजाला प्रत्येकी १०० रुपये देण्याचे आवाहन केले, तर उद्या माझ्याकडे २५०० कोटी रुपये जमा होतील. हा लहान विषय नाही शिंदेसाहेब, तीन महिन्यांनंतर आपला सामना होईल,’ असा इशाराही त्यांनी दिला.
याच मेळाव्यातून जरांगे पाटील यांनी शेतकऱ्यांच्या बिकट परिस्थितीकडेही लक्ष वेधले. येत्या दोन महिन्यांत परिस्थिती अधिक भयानक होणार आहे, त्यामुळे एकमेकांची मजा न बघता पाणी वाटून घेण्याचे आवाहन त्यांनी केले. आपण लवकरच शेतकरी संघटना आणि कृषी तज्ज्ञांना एकत्र बोलावणार असल्याचेही ते म्हणाले. तसेच, राज्य सरकारने शेतकऱ्यांना दिलेल्या ५ हजार रुपयांच्या मदतीची त्यांनी खिल्ली उडवली.
सरकारने दिलेली ५ हजार रुपयांची मदत मिळवण्यासाठी आठ दिवस हेलपाटे मारावे लागतील. यात २ हजार रुपये पेट्रोलसाठी आणि ३२०० रुपये जेवणासाठी खर्च होतील, असे गणित मांडत त्यांनी सरकारला धारेवर धरले. ‘आपण जीएसटी भरायचा आणि यांचे बंगले मोठे होणार,’ असा संताप त्यांनी व्यक्त केला. समाजावर मोठे संकट आले असून मर्द असाल तर शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहा, असे आवाहन त्यांनी केले.
या दसरा मेळाव्यातून मनोज जरांगे यांनी सरकारसमोर ५ प्रमुख मागण्या ठेवल्या आहेत. यामध्ये शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपये मदत देणे, संपूर्ण कर्जमाफी करणे, पीक विम्याचे सर्व पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करणे, शेतकऱ्यांचे रखडलेले सर्व अनुदान देणे आणि गावोगावी चारा छावण्या उभारणे या मागण्यांचा समावेश आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- मनोज जरांगेंच्या ५०० कोटींच्या दाव्याने खळबळ; शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांची पहिली प्रतिक्रिया
- शेतकऱ्यांना हेक्टरी १ लाख रुपये मदत द्या; नारायणगडावरून मनोज जरांगे पाटलांचा सरकारला इशारा, ५ प्रमुख मागण्या
- मला ठार मारण्याचा कट, ३० मिनिटांची गुप्त चर्चा माझ्याकडे; मनोज जरांगे पाटील यांचा खळबळजनक दावा
Quick Answers
मनोज जरांगे पाटील यांचा दसरा मेळावा बीड जिल्ह्यातील 'धाकटी पंढरी' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नारायण गडावर पार पडला.
भाजपकडून ५०० कोटी रुपये आणून ते श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून मला दिले, अशी खोटी माहिती एकनाथ शिंदे यांनी दिल्लीतील भाजप नेत्यांना दिली का, असा सवाल आणि आरोप मनोज जरांगे यांनी केला आहे.
मराठा समाजाला प्रत्येकी १०० रुपये देण्याचे आवाहन केले, तर उद्या सकाळपर्यंत आपल्याकडे २५०० कोटी रुपये जमा होतील, असा दावा जरांगे यांनी केला.
शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपये मदत देणे, संपूर्ण कर्जमाफी करणे, पीक विम्याचे सर्व पैसे थेट खात्यात जमा करणे, रखडलेले सर्व अनुदान देणे आणि गावोगावी चारा छावण्या उभारणे या ५ प्रमुख मागण्या त्यांनी ठेवल्या आहेत.
टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.
Ask Maharashtra Desha
आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.








