Share

पंतप्रधान मोदी, अमित शाहांना सद्बुद्धी मिळण्यासाठी इंडिया आघाडी राजघाटावर आंदोलन करणार: मल्लिकार्जुन खर्गे

मत चोरी आणि महागाईच्या मुद्द्यांवरून इंडिया आघाडी राजघाटवर धरणे आंदोलन करणार असून, पंतप्रधान मोदींना सद्बुद्धी मिळावी यासाठी प्रार्थना करणार असल्याचे खर्गे म्हणाले.

Published On: 

Mallikarjun Kharge on youth unemployment

प्रतिनिधी, 8 ऑक्टोबर: इंडिया आघाडीचे प्रमुख मल्लिकार्जुन खर्गे यांनी नुकतीच एका पत्रकार परिषदेत राजघाट येथे आघाडीच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याची घोषणा केली. वाढती महागाई, तरुणांची बेरोजगारी, मत चोरी आणि संविधानाला असलेला धोका या मुद्द्यांवरून केंद्र सरकारचा निषेध नोंदवण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे.

सत्ताधारी पक्ष देशाच्या हिताचे काम करत नसल्याची टीका करताना खर्गे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर थेट निशाणा साधला. भाजप सरकार, पंतप्रधान मोदी आणि शाह यांना सद्बुद्धी मिळावी यासाठी आपण गांधी स्मारकावर जाऊन प्रार्थना करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. याशिवाय नरेंद्र मोदी, अमित शाह यांच्यासह ज्ञानेश कुमार आणि मोहन भागवत यांनी हिंदुस्थानला हायजॅक करून मते चोरल्याचा व संविधान नष्ट केल्याचा अत्यंत गंभीर आरोपही त्यांनी लावला आहे.

विरोधकांची मुस्कटदाबी होत असल्याचा मुद्दाही खर्गे यांनी उपस्थित केला. देशातील सुमारे ३०० लोकसभा आणि राज्यसभा खासदारांना शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करण्यापासून रोखण्यात आल्याचा दावा त्यांनी केला. निवडणूक आयोग आणि जंतरमंतर येथे आंदोलन करण्यासाठी परवानगी नाकारण्यात आल्याचे सांगत, जंतरमंतरवर मारहाण झाल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

पंडित जवाहरलाल नेहरू, महात्मा गांधी आणि वल्लभभाई पटेल यांच्यासारख्या नेत्यांनी देशाला मिळवून दिलेले स्वातंत्र्य आणि मतदानाचा अधिकार सध्या हिरावून घेण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे खर्गे म्हणाले. मात्र, विरोधक या प्रकारावर कारवाई करतील आणि जनतेला न्याय मिळवून देतील, अशी हमी त्यांनी दिली आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

Quick Answers

वाढती महागाई, तरुणांची बेरोजगारी, मत चोरी आणि संविधानाला असलेला धोका या मुद्द्यांवरून केंद्र सरकारचा निषेध नोंदवण्यासाठी इंडिया आघाडी राजघाटावर धरणे आंदोलन करणार आहे. तसेच भाजप सरकार, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांना सद्बुद्धी मिळावी म्हणून गांधी स्मारकावर प्रार्थना केली जाणार असल्याचे मल्लिकार्जुन खर्गे यांनी स्पष्ट केले.

टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.

AI-assisted · Powered by Gemini
AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी महाराष्ट्र देशाच्या उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
हेही विचारू शकता
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही