राज्यात भूजल पातळीत मोठी घट; ८७ टक्के विहिरींचे पाणी गेले तळाला

राज्यातील तब्बल ३,३२१ निरीक्षण विहिरींच्या भूजल पातळीत मोठी घट झाली असून, मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात पाणीटंचाईचे गंभीर संकट निर्माण झाले आहे.

Published On: 

Drought relief drought affected cracked farm land

प्रतिनिधी, 17 नोव्हेंबर: महाराष्ट्रातील भूजल पातळीबाबत अतिशय चिंताजनक माहिती समोर आली आहे. भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेने केलेल्या पाहणीनुसार, राज्यातील ३ हजार ८१६ निरीक्षण विहिरींपैकी तब्बल ३ हजार ३२१ विहिरींच्या पाणीपातळीत मोठी घट झाली आहे. म्हणजेच राज्याच्या सुमारे ८७ टक्के विहिरींमधील पाणी वेगाने खाली गेले आहे.

या सर्वेक्षणात ९६४ विहिरींमधील पाण्याची पातळी तीन मीटरपेक्षा जास्त खोल गेल्याचे स्पष्ट झाले आहे. मराठवाड्याला या पाणीटंचाईचा सर्वात मोठा फटका बसला असून, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातही भूजल पातळी झपाट्याने कमी होत असल्याचे सर्वेक्षणातून उघड झाले आहे.

विभागनिहाय आकडेवारीनुसार, मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर विभागात सर्वाधिक ८६२ विहिरींमधील पाणी कमी झाले असून, यातील ५९४ विहिरींची पातळी तीन मीटरपेक्षा अधिक घटली आहे. त्याखालोखाल उत्तर महाराष्ट्रातील नाशिक विभागात ६५० (१६० विहिरी ३ मीटरपेक्षा अधिक घट), तर पश्चिम महाराष्ट्रात पुणे विभागात ५५८ (११७ विहिरी ३ मीटरपेक्षा अधिक घट) विहिरींची नोंद झाली आहे. याशिवाय अमरावती विभागात ५३१ पैकी ६६, नागपूर विभागात ५३० पैकी १८ आणि कोकण विभागातील १९० पैकी ९ विहिरींमध्ये तीन मीटरपेक्षा अधिक घसरण पाहायला मिळाली.

गेल्या अकरा वर्षांतील आकडेवारीची तुलना केल्यास परिस्थितीचे गांभीर्य लक्षात येते. २०१५ मध्ये भूजलपातळीत घट झालेल्या विहिरींची संख्या २ हजार २४६ होती, ती सप्टेंबर २०२६ अखेर ३ हजार ३२१ वर पोहोचली आहे. या काळात १ हजार ७५ विहिरींची नव्याने भर पडली. २०१५ च्या तुलनेत उत्तर महाराष्ट्रात ३६२ वरून ६५०, नागपूर विभागात २७९ वरून ५३०, तर अमरावती विभागात २९८ वरून ५३१ पर्यंत या विहिरींची संख्या वाढली आहे.

भूजलाचा हा वाढता ताण कमी करण्यासाठी नागपूर जिल्हा परिषदेने पावले उचलली आहेत. दुष्काळावर मात करण्यासाठी नागपूर जिल्ह्यातील वापरात नसलेल्या तब्बल १८ हजार जुन्या विहिरींचे पुनरुज्जीवन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच, दुष्काळग्रस्त १४० गावांसाठी प्रशासनाने २५ खासगी विहिरींचे अधिग्रहण केल्याची माहिती नागपूर जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंते अशोक धोंगे यांनी दिली आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

MHD News

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही