Share

Kasba election | रवींद्र धंगेकरांची आगेकूच; अभिजित बिचुकलेंना एवढी मत

🕒 1 min read Kasba election | Abhijit Bichukale | पुणे : कसबा आणि चिंचवड या मतदार संघाच्या पोटनिवडणुकीचे वारे अधिक वाहत होते. यात एखाद्या चित्रपटासारखे ट्विस्ट घडताना पाहायला मिळत होते. आज मतमोजणी आहे. आज सर्व राज्याचं लक्ष या पोटनिवडणुकीकडे लागलं आहे. कोण जिंकेल आणि कोणाचा पराभव होईल हे पाहण्याजोगे असणार आहे. यातच आता चिंचवड … Read more

Published On: 

🕒 1 min read

Kasba election | Abhijit Bichukale | पुणे : कसबा आणि चिंचवड या मतदार संघाच्या पोटनिवडणुकीचे वारे अधिक वाहत होते. यात एखाद्या चित्रपटासारखे ट्विस्ट घडताना पाहायला मिळत होते. आज मतमोजणी आहे. आज सर्व राज्याचं लक्ष या पोटनिवडणुकीकडे लागलं आहे. कोण जिंकेल आणि कोणाचा पराभव होईल हे पाहण्याजोगे असणार आहे. यातच आता चिंचवड महायुतीच्या अश्विनी जगताप तसेच महाविकास आघाडीचे नाना काटे आणि अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांच्यात तिहेरी जंग पहायला मिळत आहे. तर कसब्यात महाविकास आघाडीचे रवींद्र धंगेकर आणि महायुतीचे हेमंत रासने यांच्यात लढत आहे. अशावेळी राज्यातील काही जनतेचे अभिजित बिचुकले यांच्याकडे देखील लक्ष लागले आहे.

कुणाला किती मते : 

सुरुवातीला महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांना ७ हजार ८४४ मते मिळाली. तर भाजपच्या हेमंत रासने यांना २ हजार ८६३ मत मिळाली. दुसरीकडे सदा चर्चेत असलेले अभिजित बिचुकले यांना केवळ ४ मते मिळाली आहेत. यामुळे राजकारणात हशा फुटला आहे.

रवींद्र धंगेकरांची आगेकूच : 

रवींद्र धंगेकर हे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत. काही दिवसांपूर्वी भाजपने पोलिसांना हाताशी घेऊन पैसे वाटले असा आरोप यांनी केला होता. त्यांनी याविरुद्ध उपोषण देखील केलं होत. याचाच परिणाम महायुतीचे उमेदवार हेमंत रासने यांच्या मतांवर झाल्याचं पाहायला मिळत आहे. यामुळे आता राज्यातील जनतेचं लक्ष लागलं आहे.

महत्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या