Share

IND vs WI : वेस्ट इंडिजचा भारताविरुद्ध ६ विकेट्सने विजय, टी२० च्या एकाच सामन्यात ५०० धावांचा विक्रम

वेस्ट इंडिजने भारताचा ६ विकेट राखून पराभव करत पाच सामन्यांच्या टी२० मालिकेत १-१ ने बरोबरी साधली. या विक्रमी सामन्यात ५०० धावा झाल्या.

Published On: 

IND vs WI T20 match West Indies run chase and Shai Hope century

प्रतिनिधी, 10 ऑक्टोबर: टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करताना २४९ धावा केल्या होत्या. या लक्ष्याचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजने १८.३ षटकांत २५२ धावा करून भारताचा ६ विकेट राखून पराभव केला. या विजयासह वेस्ट इंडिजने पाच सामन्यांच्या टी२० मालिकेत १-१ ने बरोबरी साधली आहे.

वेस्ट इंडिजच्या या विजयाचा शिल्पकार कर्णधार शाई होप ठरला. २५० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजच्या ५८ धावांवर तीन विकेट्स पडल्या होत्या. मात्र, त्यानंतर शाई होप आणि शेर्फन रुदरफोर्ड यांनी डाव सावरत ५४ चेंडूंमध्ये १२० धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. शाई होपने ४५ चेंडूंमध्ये नाबाद १०२ धावांची शतकी खेळी केली, तर शेर्फन रुदरफोर्डने ३७ चेंडूंमध्ये ८४ धावा केल्या.

कुलदीप यादवने शेर्फन रुदरफोर्डला विकेटच्या मागे बाद करून शाई होप आणि रुदरफोर्ड यांची ही भागीदारी मोडली. त्यानंतर रोमारीओ शेफर्डने १३ चेंडूंमध्ये ३४ धावांची ताबडतोब फलंदाजी करत शाई होपला साथ दिली.

भारत आणि वेस्ट इंडिज (IND vs WI) यांच्यातील या एकाच टी२० सामन्यात एकूण ५०० धावा झाल्या. त्यामुळे या रेकॉर्ड ब्रेक धावा आहेत. आजच्या या सामन्यात टी२० मधील दुसऱ्या सर्वाधिक धावा करण्यात आल्या. यापूर्वी २००९ साली साऊथ आफ्रिका आणि वेस्ट इंडिज यांच्यात पार पडलेल्या टी२० सामन्यात ५१७ धावा झाल्या होत्या, ज्या टी२० क्रिकेटमधल्या सर्वाधिक धावा आहेत.

📌 महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी महाराष्ट्र देशाच्या उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही