हिवाळ्यात केस गळण्यामागे असू शकतात तुमच्याच ‘या’ चुका; आजच बदला हेअर केअर पद्धत

हिवाळ्यात केस गळण्यामागे आपल्याच काही चुका कारणीभूत असू शकतात. या चुका टाळून केसांची योग्य काळजी कशी घ्यावी, याबाबतच्या महत्त्वाच्या टिप्स जाणून घ्या.

Published On: 

Winter hair care remedies for dandruff and itchy scalp

प्रतिनिधी, 21 नोव्हेंबर: हिवाळ्यातील थंड आणि कोरड्या हवामानामुळे केस गळण्याची समस्या अनेकांना सतावते. या दिवसांत हवेतील आर्द्रता आणि तापमान कमी झाल्याने केसांमधील नैसर्गिक ओलावा नाहीसा होतो. परिणामी, केस कोरडे पडून निस्तेज आणि कमकुवत होऊ लागतात. मात्र, रोजच्या हेअर केअर रुटीनमध्ये नकळत होणाऱ्या काही चुका टाळल्यास केसांच्या या समस्येवर नियंत्रण मिळवता येते.

हिवाळ्यात केसांना तेल न लावण्याची अनेकांची सवय नुकसानकारक ठरू शकते. केसांचा ओलावा टिकवून ठेवण्यासाठी आठवड्यातून दोन वेळा कोमट तेलाने टाळू आणि केसांना हलक्या हाताने मसाज करणे आवश्यक आहे. तसेच, थंडीपासून बचाव करण्यासाठी केस धुताना कडक गरम पाण्याचा वापर केल्यास केसांमधील नैसर्गिक तेल कमी होते. त्यामुळे गरम पाण्याऐवजी नेहमी कोमट पाण्याचा वापर करावा.

केस धुताना शॅम्पू थेट केसांवर लावण्याऐवजी तो पाण्यात मिसळून वापरणे अधिक फायदेशीर ठरते. एका भाग शॅम्पूमध्ये तीन भाग पाणी मिसळल्याने तो सर्वत्र समान पसरतो आणि त्याचा अतिरिक्त वापरही टळतो. याशिवाय, थंडीत केस लवकर सुकवण्यासाठी हेअर ड्रायरचा अतिवापर केल्यास त्यातील गरम हवेमुळे केस कमकुवत होऊन तुटण्याची शक्यता वाढते. त्यामुळे शक्यतो केस नैसर्गिकरीत्या सुकू द्यावेत किंवा ड्रायरचा वापर करायचाच असल्यास तो कमी तापमानावर करावा.

त्वचेप्रमाणेच हिवाळ्यात केसांचीही विशेष काळजी घेणे गरजेचे असते. थंडीत वाढणारा कोरडेपणा कमी करण्यासाठी आठवड्यातून एकदा हेअर मास्कचा वापर करावा. यामुळे केसांना अतिरिक्त ओलावा मिळून ते मऊ आणि मुलायम राहतात. तसेच केसांमधील गुंता कमी झाल्यामुळे ते मधूनच तुटण्याचे प्रमाणही घटते.

📌 महत्वाच्या बातम्या

MHD News

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही