हिवाळ्यात केसांच्या अनेक समस्यांवर रामबाण उपाय आहे ‘एलोवेरा जेल’, जाणून घ्या वापराची पद्धत

हिवाळ्यातील कोरड्या हवेमुळे होणारी केसगळती, कोंडा आणि टाळूच्या खाजेवर कोरफड (एलोवेरा जेल) अत्यंत गुणकारी ठरते. जाणून घ्या याचे फायदे.

Published On: 

Aloe vera gel applied to hair for winter hair care and dandruff treatment

प्रतिनिधी, 19 नोव्हेंबर: प्रत्येकालाच आपले केस दाट, लांबसडक आणि चमकदार हवे असतात. मात्र बदलती जीवनशैली, वाढते प्रदूषण, केसांची योग्य काळजी न घेणे आणि ऋतुमानातील बदलांमुळे अनेक समस्या निर्माण होतात. विशेषतः हिवाळ्यात कोरड्या हवेमुळे केस कोरडे पडणे, कोंडा होणे आणि टाळूला खाज येणे या समस्या वाढीस लागतात.

केसांच्या या समस्यांवर उपाय म्हणून अनेकजण महागड्या उत्पादनांचा वापर करतात, पण घरच्या घरी सहज उपलब्ध होणारी कोरफड (एलोवेरा जेल) अत्यंत फायदेशीर ठरू शकते. कोरफडीमुळे केवळ त्वचाच नाही, तर केसांची गुणवत्ताही सुधारते. यामुळे केसांना आवश्यक ओलावा मिळण्यास मदत होते.

हिवाळ्यातील थंड व कोरड्या हवेमुळे टाळूचा कोरडेपणा वाढून कोंडा होतो. यावर उपाय म्हणून आंघोळ करण्यापूर्वी अर्धा तास आधी टाळूवर एलोवेरा जेल लावून बोटांनी हलक्या हाताने मसाज करावा. त्यानंतर केस स्वच्छ पाण्याने धुतल्यास टाळूला ओलावा मिळतो आणि कोंड्यापासून सुटका होण्यास मदत होते.

कंडिशनर वापरूनही जर तुमचे केस मऊ होत नसतील, तर शॅम्पू केल्यानंतर केसांना कोरफडीचे जेल लावून पाहावे. काही वेळाने केस स्वच्छ धुतल्यास त्यांचा कोरडेपणा कमी होण्यास मदत मिळते. या नैसर्गिक उपायामुळे केस अधिक चमकदार, रेशमी आणि मुलायम दिसू शकतात.

शरीरात पोषक घटकांची कमतरता असल्यास केस कमकुवत होऊन गळू लागतात. केसगळती कमी करण्यासाठी आणि केसांना योग्य पोषण देण्यासाठी आठवड्यातून दोन वेळा कोरफडीचा हेअर मास्क लावता येऊ शकतो. यामुळे केसांची योग्य निगा राखली जाऊन त्यांना पुरेसा ओलावा मिळतो.

टाळूच्या कोरडेपणामुळे खाज येत असल्यास, एका भांड्यात एलोवेरा जेल, एका लिंबाचा रस आणि थोडे खोबरेल तेल एकत्र करून ते मिश्रण १५ ते २० मिनिटांसाठी टाळूवर लावून ठेवावे. त्यानंतर शॅम्पूने केस धुवावेत. मात्र, लिंबाच्या रसामुळे जळजळ होण्याची शक्यता असते, त्यामुळे संवेदनशील टाळू असलेल्यांनी हा उपाय करणे टाळावे.

📌 महत्वाच्या बातम्या

MHD News

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही