Share

Govt Job Opportunity | मेगा भरती अलर्ट! महाराष्ट्र जलसंपदा विभागात विविध पदांसाठी भरती सुरू

🕒 1 min readGovt Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या युवकांसाठी आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र जलसंपदा विभाग यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी मेगा भरती आयोजित करण्यात आली आहे. या भरतीसाठी महाराष्ट्र जलसंपदा विभागातर्फे जाहिरात देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे. या जाहिरातीमध्ये दिलेल्या पदांसाठी 03 नोव्हेंबर 2023 पासून अर्ज प्रक्रिया … Read more

Published On: 

🕒 1 min read

Govt Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या युवकांसाठी आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र जलसंपदा विभाग यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी मेगा भरती आयोजित करण्यात आली आहे.

या भरतीसाठी महाराष्ट्र जलसंपदा विभागातर्फे जाहिरात देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे. या जाहिरातीमध्ये दिलेल्या पदांसाठी 03 नोव्हेंबर 2023 पासून अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. या पदांसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.

महाराष्ट्र जलसंपदा विभाग यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेमध्ये विविध पदांच्या एकूण 4497 रिक्त जागा भरण्यात येणार आहे.

यामध्ये वरिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक (गट-ब) 04, निम्नश्रेणी लघुलेखक (गट-ब) 19, कनिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक (गट-ब) 14, वैज्ञानिक सहाय्यक (गट-ब) 05, आरेखक (गट-क) 25, सहाय्यक आरेखक (गट-क) 60, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (गट-क) 1528, प्रयोगशाळा सहाय्यक (गट-क) 35, अनुरेखक (गट-क) 284, दफ्दर कारकुन (गट-क) 430,मोजणीदार (गट-क) 758, कालवा निरीक्षक (गट-क) 1189, सहाय्यक भांडारपाल (गट-क) 138, कनिष्ठ सर्व्हक्षण सहाय्यक (गट-क) 08 जागा भरल्या जाणार आहे.

या भरती (Govt Job Opportunity) प्रक्रियेतील शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, वेतन, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत इत्यादी गोष्टींबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून बघू शकतात.

अधिकृत संकेतस्थळ (Official website)

https://wrd.maharashtra.gov.in/

जाहिरात पाहा (View ad)

https://drive.google.com/file/d/1Yej4s3a6EzVOrLPaSRYNeIM0wf8Ofjqf/view

दरम्यान, या भरती प्रक्रियेमध्ये (Govt Job Opportunity) पात्र आणि इच्छुक उमेदवारांना दिनांक 24 नोवेंबर 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येऊ शकतो.

सरकारच्या या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 ते 38 वर्ष दरम्यान असावे. तर ऑनलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवारांना खाली दिलेल्या संकेतस्थळाला भेट द्यावी लागेल.

ऑनलाइन अर्ज करा (Apply online)

https://wrd.maharashtra.gov.in/

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!