Share

सोने-चांदी खरेदीदारांसाठी मोठी बातमी : गुरुपुष्यामृत मुहूर्तावर सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण!

गुरुपुष्यामृत मुहूर्तावर सोन्या-चांदीच्या दरात बंपर घसरण झाली आहे. जळगाव सराफा बाजारात चांदी ५००० तर सोने १२०० रुपयांनी स्वस्त झाल्याने ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Published On: 

Gold Rate Today: गुरुपुष्यामृत मुहूर्तावर सोने-चांदी स्वस्त

गुरुपुष्यामृत मुहूर्तावर सोनं खरेदी करण्याचा विचार करताय? मग तुमच्यासाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे. इराण-इस्रायल युद्ध आणि जागतिक तणावामुळे गेल्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीचे भाव अक्षरशः गगनाला भिडले होते. पण आता अचानक ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. आजच्या अत्यंत शुभ मानल्या जाणाऱ्या गुरुपुष्यामृत मुहूर्तावर सोन्याचे भाव गडगडले असून, चांदीच्या दरातही अनपेक्षित घसरण पाहायला मिळाली आहे.

जळगावच्या सुवर्णनगरीतून आलेली आकडेवारी पाहता, आज सोन्याच्या दरात ₹१२०० तर चांदीच्या दरात थेट ₹५००० ची घसरण नोंदवली गेली आहे. काल बाजार बंद होताना चांदीचे दर २,५३,००० रुपये होते, जे आज घसरून २,४८,००० रुपयांवर आले आहेत. तर दुसरीकडे, सोन्याचे दर १,५२,२०० रुपयांवरून १,५१,००० रुपयांवर स्थिरावले आहेत. सणासुदीच्या या काळात Gold Rate मध्ये झालेली ही पडझड सर्वसामान्यांसाठी एक मोठी सुवर्णसंधीच ठरली आहे.

Gold Rate Today

गुरुवारी पुष्य नक्षत्र आल्यावर दुर्मिळ असा ‘गुरुपुष्यामृत योग’ जुळून येतो. हिंदू धर्मात हा दिवस सोने-चांदीची खरेदी आणि नवीन गुंतवणुकीसाठी सर्वोत्तम मानला जातो. नेमक्या याच मुहूर्तावर दर कमी झाल्याने आता सराफा बाजारात ग्राहकांची मोठी गर्दी उसळण्याची शक्यता आहे.

सोनं खरेदी करताना त्याची शुद्धता आणि कॅरेट (Carat) समजून घेणंही तितकंच गरजेचं आहे. २४ कॅरेट (24K) सोने ९९.९% शुद्ध असते, पण ते खूप मऊ असल्याने त्याचे थेट दागिने बनवणे कठीण जाते. त्यामुळे दागिन्यांना मजबुती देण्यासाठी त्यात तांबे किंवा चांदी मिसळून १८ कॅरेट (७५% शुद्ध सोने) आणि १४ कॅरेट (५८.३% शुद्ध सोने) चे दागिने बनवले जातात. हे दागिने रोजच्या वापरासाठी अत्यंत कडक आणि टिकाऊ असतात. त्यामुळे खरेदीला जाण्यापूर्वी तुम्ही किती कॅरेटचे दागिने घेत आहात, याची नक्की खात्री करा.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही