प्रतिनिधी, 9 ऑक्टोबर: रशियामध्ये एका संसर्गजन्य आजाराचा फैलाव होत असल्याने गोव्यात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. सध्या गोव्यात चार्टर विमानांद्वारे रशियन पर्यटक मोठ्या संख्येने दाखल होत आहेत. रशियाच्या सायबेरियातील इर्कुत्स्क येथील अँटी प्लेग रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये काम करणाऱ्या २८ वर्षीय लॅब टेक्निशियन दार्या शिपिलोव्हा यांचा गंभीर न्यूमोनियानंतर मृत्यू झाल्याने या आरोग्याच्या धोक्याबाबत गांभीर्य वाढले आहे.
गेल्या आठवड्यातच रशियातील येकातेरिनबर्ग येथून एका चार्टर विमानाने १६२ रशियन पर्यटक गोव्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर गोवा विधानसभेचे विरोधी पक्षनेते अलेमाओ यांनी सुरक्षेचा मुद्दा उपस्थित केला आहे. गोव्यासाठी पर्यटक महत्त्वाचे असले तरी, स्थानिकांचे आरोग्य आणि सुरक्षा ही प्राधान्याची बाब असल्याचे सांगत त्यांनी रशियाहून येणाऱ्या सर्व पर्यटकांची आरोग्य तपासणी करण्याची आणि त्यांच्यावर बारीक लक्ष ठेवण्याची मागणी केली आहे.
रशियन अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, संबंधित लॅब टेक्निशियनचा २ ऑक्टोबर रोजी न्यूमोनियाने मृत्यू झाला असून यामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र खबरदारीचा उपाय म्हणून त्यांच्या संपर्कात आलेल्या तब्बल २०० लोकांना क्वारंटाइन करण्यात आले आहे. या घटनेनंतर बायोसेफ्टी, लॅब लीक आणि संभाव्य बायो-वेपनबाबत चर्चा सुरू झाली असून जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) या प्रकरणाची दखल घेत रशियाकडून सविस्तर माहिती मागवली आहे.
दुसरीकडे, या संसर्गाचा कोणताही धोका नसल्याचा दावा रशियन अधिकाऱ्यांनी केला आहे. गोवा सरकारचे पर्यटन संचालक केदार नाईक यांनीही प्रशासनाची भूमिका स्पष्ट केली आहे. ‘WHO’ ने या आजारासंदर्भात अद्याप कोणतीही माहिती किंवा मार्गदर्शक तत्त्वे दिलेली नाहीत, त्यामुळे ‘WHO’ ने भाष्य न केल्याने सध्या तरी चिंता करण्याचे कोणतेही कारण नसून गोव्यात पर्यटकांचे स्वागत असल्याचे नाईक यांनी सांगितले.
📌 महत्वाच्या बातम्या
- दिवसातून काही क्षण मनमोकळेपणाने हसा, शारीरिक आणि मानसिक आरोग्याला मिळतील अनेक फायदे
- नानांची तब्येत उत्तम होती,पण दुर्दैवी घडले, नानाचा मुलगा मल्हार यांचे वक्तव्य…
- ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचं वयाच्या ७५ व्या वर्षी गोव्यात निधन; ‘तिरंगा’च्या सेटवरील भाजीचा किस्सा चर्चेत
Quick Answers
रशियामध्ये एका संसर्गजन्य आजाराचा फैलाव होत असताना गोव्यात चार्टर विमानांद्वारे रशियन पर्यटक मोठ्या संख्येने दाखल होत आहेत. तसेच रशियाच्या अँटी प्लेग रिसर्च इन्स्टिट्यूटमधील लॅब टेक्निशियन दार्या शिपिलोव्हा यांचा गंभीर न्यूमोनियानंतर मृत्यू झाल्याने या आरोग्याच्या धोक्याबाबत गांभीर्य वाढले आहे.
स्थानिकांचे आरोग्य आणि सुरक्षा ही प्राधान्याची बाब असल्याचे सांगत अलेमाओ यांनी रशियाहून येणाऱ्या सर्व पर्यटकांची आरोग्य तपासणी करण्याची आणि त्यांच्यावर बारीक लक्ष ठेवण्याची मागणी केली आहे.
खबरदारीचा उपाय म्हणून मृत लॅब टेक्निशियनच्या संपर्कात आलेल्या तब्बल २०० लोकांना क्वारंटाइन करण्यात आले आहे.
केदार नाईक यांच्या माहितीनुसार, 'WHO' ने या आजारासंदर्भात अद्याप कोणतीही माहिती किंवा मार्गदर्शक तत्त्वे दिलेली नाहीत. त्यामुळे 'WHO' ने भाष्य न केल्याने सध्या चिंता करण्याचे कोणतेही कारण नसून गोव्यात पर्यटकांचे स्वागत आहे.
टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.
Ask Maharashtra Desha
आधी महाराष्ट्र देशाच्या उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.









