Share

जया बच्चन यांचं बोलणं ऐकून ऐश्वर्या रायला रडू कोसळलं

Aishwarya Rai Bachchan Jaya Bachchan । ऐश्वर्या राय (Aishwarya Rai ) आणि बच्चन कुटुंबियांमध्ये अनेक दिवसांपासून वादाची ठिणगी पडली आहे, असे बोलले जात आहे. गेल्या काही दिवसांपासून ऐश्वर्या तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. बॉलीवूड मध्ये ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या घटस्फोटाची चर्चा रंगली आहे. सासू जया बच्चन सोबत मतभेद असल्याने ऐश्वर्या सासर देखील सोडल्याचे … Read more

Published On: 

Aishwarya Rai Bachchan Jaya Bachchan । ऐश्वर्या राय (Aishwarya Rai ) आणि बच्चन कुटुंबियांमध्ये अनेक दिवसांपासून वादाची ठिणगी पडली आहे, असे बोलले जात आहे. गेल्या काही दिवसांपासून ऐश्वर्या तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे.

बॉलीवूड मध्ये ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या घटस्फोटाची चर्चा रंगली आहे. सासू जया बच्चन सोबत मतभेद असल्याने ऐश्वर्या सासर देखील सोडल्याचे बोलले जात होते. पण यावर ऐश्वर्या आणि अभिषेक यांनी अधिकृत वक्तव्य केलं नाही.

ऐश्वर्या राय ही सासर सोडून आपल्या माहेरी निघून गेली असल्याची चर्चा होती. मात्र, या सगळ्या चर्चांना ऐश्वर्याने पूर्णविराम लावताना अफवा असल्याचे सांगितले होते. ऐश्वर्या राय ही सासू जया बच्चनसोबत (Jaya Bachchan) फार कमी वेळा दिसून येते.

जया बच्चन अनेकदा ऐश्वर्याचे कौतुक करत होत्या. त्या अनेकवेळा सार्वजनिक ठिकाणी ऐश्वर्याचे कौतुक करताना दिसत होत्या. असाच एक फिल्मफेअर अवॉर्ड शोमधील व्हिडीओ व्हायरल झाला असून त्यात जया यांनी केलेल्या कौतुकामुळे ऐश्वर्या रायच्या डोळ्यात अश्रू आले होते.

Aishwarya Rai cried because of mom-in-law Jaya Bachchan

ऐश्वर्या रायचे लग्न अभिषेक बच्चनसोबत झाल्यानंतर जया फिल्मफेअर अवॉर्ड शोमध्ये उपस्थित होत्या. या ठिकाणी जया यांनी ऐश्वर्याचे कौतुक करत म्हंटले, ‘मी पुन्हा एकदा एका सुंदर मुलीची सासू झाली आहे, जिच्याकडे खूप मूल्य आणि प्रतिष्ठा आहे. मलाही तिचं हसणं खूप आवडतं. बच्चन परिवारात मी तुझं स्वागत करते. माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे. जया बच्चन यांनी केलेल्या कौतुकानंतर ऐश्वर्या रायच्या डोळ्यात अश्रू आले.

व्हिडीओ लिंक –

https://www.instagram.com/p/BzXuPM1nAgM/?utm_source=ig_web_copy_link

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही