प्रकाश आंबेडकरांनी संजय राऊतांना झापले; म्हणाले शहाणपण शिकवू… !

Prakash Ambedkar Vs Sanjay Raut । भाजपसोबत राहिलेल्या संजय राऊतांनी त्यांनी आम्हाला शहाणपणा शिकवू नये

Prakash Ambedkar : शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी शरद पवार गट आणि काँग्रेसमध्ये मतभेद असल्याचं वंचित आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी दावा केला आहे.

वंचित महाविकास आघाडी सामील होण्याबाबत अद्याप ठोस निर्णय झालेला नाही. भाजपाबरोबर राहिलेत त्यांनी आम्हाला शहाणपण शिकवू नये, असं म्हणत वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी संजय राऊतांना झापले आहे.

Prakash Ambedkar Vs Sanjay Raut

वंचितने स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतल्यास त्याला महाविकास आघाडी पाठिंबा देणार असल्याच्या राऊतांच्या वक्तव्यावर प्रकाश आंबेडकरांनी प्रतिउत्तर दिले आहे. तसेच उद्धव ठाकरेंशी कोणतेही मतभेद नसल्याचं आंबेडकरांनी स्पष्ट केलं आहे.

युतीबाबत बोलताना प्रकाश आंबेडकरांनी म्हणाले की, महाविकास आघाडीतील पक्षांत भांडणे आहेत, तेच भांडण मिटवत नाहीत. त्यांनी दिलेला तीन जागेचा प्रस्ताव आम्ही फेटाळून लावला आहे. भाजपला हरवण्यासाठी जी पाऊले उचलायला लागतील ती आम्ही उचलणार, असल्याचं आंबेडकर म्हणाले.

आंबेडकरांनी मल्लिकार्जुन खरगेंना पत्र लिहीत काँग्रेसला सात जागांवर पाठिंबा देण्याचा प्रस्ताव दिला आहे. आमची ऑफर शेवच्या क्षणापर्यंत कायम राहिल. अखेरच्या दिवसापर्यंत आम्ही वाट पाहू त्यानंतर आम्ही निर्णय घेऊ.

Prakash Ambedkar wrote a letter to Mallikarjun Kharge 

भारत जोडो यात्रेच्या समारोपाच्या सभेदरम्यान तुम्हाला आणि राहुल गांधी यांना भेटून आनंद झाला. मात्र त्यावेळी आपली सविस्तर चर्चा होऊ न शकल्याने मी आज हे पत्र लिहीत आगे. लोकसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा झाली आहे. मात्र वंचित बहुजन आघाडीला निमंत्रण न देता महाविकास आघाडीचे नेते सतत बैठका घेत आहे.

काही बैठकांमध्ये वंचितच्या प्रतिनिधींचं म्हणणं ऐकून घेण्यास शिवसेना (उबाठा) आणि राष्ट्रवादी ( शरदचंद्र पवार) यांच्या पक्षाने नकार दिला. वंचित बहुजन आघाडीचा या दोन पक्षांवरील विश्वास उडाला आहे, अशा शब्दांत प्रकाश आंबेडकर यांनी त्यांची नाराजी व्यक्त केली.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.