एबी डिव्हिलियर्सचा ‘वर्ल्ड चॅम्पियनशिप’मध्ये धमाका; अवघ्या 37 चेंडूंत शतक ठोकत ऑस्ट्रेलियन चॅम्पियन्सचा उडवला धुव्वा

एबी डिव्हिलियर्सने वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लेजेंड्समध्ये अवघ्या 37 चेंडूंत शतक झळकावले. त्याच्या नाबाद 111 धावांच्या खेळीने दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियन चॅम्पियन्सचा सहज पराभव केला.

Published On: 

AB de Villiers batting during World Championship of Legends

प्रतिनिधी, 11 ऑक्टोबर: आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतरही एबी डिव्हिलियर्सचा दबदबा कायम असल्याचा प्रत्यय वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लेजेंड्समध्ये आला आहे. दक्षिण आफ्रिकन चॅम्पियन्सकडून खेळताना त्याने ऑस्ट्रेलियन चॅम्पियन्सविरुद्ध अवघ्या 37 चेंडूंत शतक झळकावण्याचा पराक्रम केला. डिव्हिलियर्सच्या या स्फोटक खेळीच्या बळावर दक्षिण आफ्रिकेने 210 धावांचे तगडे लक्ष्य केवळ 15.4 षटकांत दोन गडी गमावून सहज पूर्ण केले.

या 210 धावांच्या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेची सुरुवात खराब झाली होती. डावाच्या दुसऱ्याच षटकात केन रिचर्डसनने फॅफ डु प्लेसिसला अवघ्या पाच धावांवर माघारी धाडले. मात्र, त्यानंतर मैदानात आलेल्या डिव्हिलियर्सने ऑस्ट्रेलियन गोलंदाजांची अक्षरशः पिसे काढली. त्याने 40 चेंडूंचा सामना करताना 11 षटकार आणि 6 चौकारांची आतषबाजी करत नाबाद 111 धावा कुटल्या.

डिव्हिलियर्सला दुसऱ्या बाजूने रिचर्ड लेव्हीची भक्कम साथ मिळाली. लेव्हीने 29 चेंडूंत 5 षटकार आणि 3 चौकारांच्या मदतीने 62 धावांची खेळी केली. या दोघांनी मिळून 127 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी रचली. लेव्ही बाद झाल्यानंतर जेपी ड्युमिनीने डिव्हिलियर्सला साथ देत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

तत्पूर्वी, प्रथम फलंदाजी करणाऱ्या ऑस्ट्रेलियन चॅम्पियन्सने 5 बाद 209 धावांपर्यंत मजल मारली होती. सलामीवीर उस्मान ख्वाजा नऊ धावांवर बाद झाल्यानंतर डार्सी शॉर्ट आणि कर्णधार डेव्हिड वॉर्नर यांनी दुसऱ्या विकेटसाठी 95 धावांची भागीदारी केली. शॉर्टने सर्वाधिक 25 चेंडूंत 66 धावा फटकावल्या, ज्यात 5 षटकार आणि 7 चौकारांचा समावेश होता.

कर्णधार वॉर्नरने 37 चेंडूंत 5 चौकार आणि 2 षटकारांसह 48 धावा केल्या. तळाच्या फळीत जो बर्न्सने नाबाद 28 (25 चेंडू) आणि जोनाथन वेल्सने 23 धावांचे (12 चेंडू) योगदान दिले. मात्र, ऑस्ट्रेलियन फलंदाजांची ही मोठी मजल डिव्हिलियर्सच्या वादळी शतकापुढे निष्प्रभ ठरली आणि दक्षिण आफ्रिकन चॅम्पियन्सने दणदणीत विजय मिळवला.

📌 महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
MHD News

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही