मतदारसंघ पुनर्रचना विधेयकावरून शरद पवार गटात खदखद; बड्या नेत्याचा तडकाफडकी राजीनामा

मतदारसंघ पुनर्रचना विधेयकावरून पक्षाच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त करत अभयसिंह जगताप यांनी शरद पवार गटाच्या सर्व पदांचा आणि सदस्यत्वाचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे.

Published On: 

Sharad Pawar MPs meeting PM Modi in Delhi

प्रतिनिधी, २९ नोव्हेंबर: सोमवारी लोकसभेत मांडल्या जाणाऱ्या मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाकडून पाठिंबा मिळण्याची शक्यता आहे. या वृत्तानंतर पक्षात तीव्र नाराजीचे सूर उमटू लागले असून राजीनामासत्र सुरू झाले आहे. माण-खटाव विधानसभा अध्यक्ष आणि युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अभयसिंह जगताप यांनी पक्षाच्या भूमिकेवर खदखद व्यक्त करत सर्व पदांचा आणि प्राथमिक सदस्यत्वाचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे.

अभयसिंह जगताप यांनी प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्याकडे आपला राजीनामा सुपूर्द केला. पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी विचार आणि निष्ठेशी तडजोड केल्याचा थेट आरोप त्यांनी आपल्या पत्रात केला आहे. मतदारसंघ पुनर्रचना विधेयकामुळे केवळ खासदारांची संख्या किंवा महिलांना ३३% आरक्षण मिळणार नाही, तर मतदारसंघांच्या सीमा भाजपला फायदेशीर ठरतील अशा पद्धतीने नव्याने निश्चित केल्या जातील. विरोधकांना हद्दपार करण्याचा सत्ताधाऱ्यांचा डाव असताना आपला पक्ष त्याला पाठिंबा देतोय, हे वेदनादायी असल्याचे जगताप यांनी म्हटले आहे.

सामान्य कार्यकर्त्यांच्या व्यथा मांडताना जगताप यांनी नमूद केले की, तळागाळातील कार्यकर्ते सत्ताधाऱ्यांशी संघर्ष करताना मोठा त्रास आणि आर्थिक नुकसान सहन करतात. मात्र, आपला पक्ष जर सत्ताधाऱ्यांशीच हातमिळवणी करत असेल, तर कार्यकर्त्यांनी लढायचे कशासाठी? पक्षाची भूमिका अनेक बाबतीत संदिग्ध वाटत असल्याने हवालदिल झालेल्या सामान्य कार्यकर्त्यांची अवस्था ‘ना घर का ना घाट का’ अशी झाली असल्याची उद्विग्नता त्यांनी व्यक्त केली.

पक्षातील फुटीनंतरही आपण शरद पवार यांच्याशी एकनिष्ठ राहिलो. माढा लोकसभा मतदारसंघात पक्षाचे नवीन चिन्ह पोहोचवले आणि सांगली-सातारा विधानपरिषद निवडणूक ताकदीने लढवली, याची आठवण त्यांनी पत्रात करून दिली. पक्ष जर भाजपशी जुळवून घेणार असेल, तर कार्यकर्त्यांनी थेट भाजपमध्ये जाणे किंवा भाजपला ठाम विरोध करणाऱ्या पक्षाला पाठिंबा देणे योग्य ठरेल, असे सांगत त्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. शरद पवारांवरील आदर कायम असला तरी पक्षाच्या निर्णयाशी सहमत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

📌 महत्त्वाच्या बातम्या

MHD News

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही