एकनाथ शिंदे म्हणजेच शिवसेना तर संपूर्ण पक्ष सोबत का गेला नाही? सर्वोच्च न्यायालयात कपिल सिब्बल यांचा सवाल

सर्वोच्च न्यायालयात शिवसेना पक्ष आणि चिन्हावरील सुनावणीत कपिल सिब्बल यांनी एकनाथ शिंदे म्हणजेच शिवसेना या दाव्यावर जोरदार युक्तिवाद करत अनेक सवाल उपस्थित केले.

Published On: 

Kapil Sibal arguing in Supreme Court on Shiv Sena party symbol dispute

प्रतिनिधी, २५ नोव्हेंबर: शिवसेना आणि पक्ष चिन्हावरील सुनावणीत ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी शिंदे गटाच्या वकिलांचा युक्तिवाद खोडून काढला आहे. ‘एकनाथ शिंदे म्हणजेच शिवसेना, तर मग संपूर्ण पक्ष त्यांच्यासोबत का गेला नाही?’ असा थेट सवाल सिब्बल यांनी उपस्थित केला. तसेच आमदारांच्या अपात्रतेची याचिका अद्यापही वैध असल्याचे सांगत विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयावर न्यायालय पुनरावलोकन करू शकते, असे त्यांनी स्पष्ट केले.

सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या त्रिसदस्यीय खंडपीठासमोर कपिल सिब्बल यांनी हा तगडा युक्तिवाद केला. विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत राजन साळवी आणि राहुल नार्वेकर यांच्यात लढत झाली. त्यावेळी पक्षाने सुनील प्रभू यांना व्हिप म्हणून नियुक्त केले होते. मात्र, एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेल्या आमदारांनी भाजपचा पाठिंबा असलेल्या सरकारच्या बाजूने मतदान केले. हे मतदान पक्षहिताचे होते का, याकडे सिब्बल यांनी न्यायालयाचे लक्ष वेधले.

केवळ विचारधारेवरून पक्षावर दावा करणे शक्य नाही, असे सांगत विधिमंडळ पक्ष हा कधीही राजकीय पक्ष होऊ शकत नाही, असा पुनरुच्चार सिब्बल यांनी केला. तसेच दुसरा विधिमंडळ पक्षही काढला जाऊ शकत नाही. आमदारांच्या अपात्रतेची याचिका योग्य वेळी दाखल केली होती, त्यामुळे आता टर्म संपली म्हणून तो विषय संपला, असे म्हणणे पूर्णपणे चुकीचे असल्याचे त्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.

आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय या प्रकरणासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. जर शिंदेंचे आमदार अपात्र ठरले, तर निवडणूक आयोगाचा निर्णय चुकीचा ठरेल, असे सिब्बल म्हणाले. सुभाष देसाई प्रकरणानुसार विशिष्ट वेळेत याचिका निकाली काढली जायला हवी होती. जर गोष्टी वेळेत झाल्या असत्या, तर महाराष्ट्राचा इतिहास वेगळा राहिला असता, असेही त्यांनी सुनावणीदरम्यान नमूद केले.

अपात्रतेवर निर्णय न घेणे हा अन्याय केल्यासारखे आहे. न्यायालयात किती वेळ जातो याचा राजकीय पक्षाशी संबंध जोडता येणार नाही. राजकीय पक्षात फूट पडू नये, हाच १० व्या सूचीचा मुख्य उद्देश आहे. त्यामुळे विधानसभा अध्यक्षांनी १० व्या सूचीनुसार निर्णय घेतला आहे की नाही, हे न्यायालय पाहू शकते. विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाचे पुनरावलोकन करण्याचे अधिकार न्यायालयाला असल्याचे कपिल सिब्बल यांनी आपल्या युक्तिवादात स्पष्ट केले.

📌 महत्त्वाच्या बातम्या

MHD News

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही