पवार कुटुंबावर लक्ष्मण हाके बरसले; रोहित पवारांच्या शेतकरी मोर्चाला म्हणाले ‘ढोंगीपणा’!

रोहित पवारांचे शेतकरी आंदोलन हा ढोंगीपणा असून पवार कुटुंबाचे २५-३० कारखाने शेतकऱ्यांचे शोषण करतात, अशी सडकून टीका लक्ष्मण हाके यांनी केली आहे.

Published On: 

Laxman Hake on OBC certificates

प्रतिनिधी, २५ नोव्हेंबर: लक्ष्मण हाके यांनी पवार कुटुंबावर आणि त्यांच्या राजकीय भूमिकेवर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. रोहित पवार यांनी शेतकऱ्यांसाठी काढलेले ट्रॅक्टर मोर्चे हा निव्वळ ढोंगीपणा असल्याची सडकून टीका हाके यांनी केली आहे. एका बाजूला स्वतःचे २५-३० साखर कारखाने चालवून शेतकऱ्यांचे शोषण करायचे आणि दुसऱ्या बाजूला त्यांच्याच प्रश्नांसाठी आंदोलने करायची, हे पूर्णपणे हास्यास्पद असल्याचे ते म्हणाले.

पवार कुटुंबीयांचे साखर कारखाने मोठ्या प्रमाणावर दारूचे उत्पादनही करतात. या कारखान्यांमध्ये एका दिवसाला लाखो लिटर दारू तयार केली जाते, असा दावाही हाके यांनी केला आहे.

शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्या राजकीय भूमिकेवरही त्यांनी थेट निशाणा साधला. अंजली आंबेडकर यांनी पवारांना भाजपची ‘बी टीम’ म्हटले होते, याचा संदर्भ देत हाके म्हणाले की, शरद पवार आणि सुप्रिया सुळे हे भाजपची बी टीम नसून ते थेट भाजपचेच आहेत. त्यांचे वर्तन भाजपच्या बाजूने असल्याचे सांगतानाच पवारांची भूमिका नेहमीच संभ्रम निर्माण करणारी असते, असेही त्यांनी नमूद केले.

महाराष्ट्रातील सद्यस्थितीवर भाष्य करताना हाके यांनी सर्वच नेत्यांना लक्ष केले. राज्यातील प्रत्येक नेता केवळ सत्तेच्या आणि मंत्रिपदाच्या मागे धावत आहे. स्वतःचे कारखाने वाचवणे आणि डीसीसी बँकांमध्ये आपल्या पुढील पिढीची सोय लावणे, एवढीच चिंता या नेत्यांना सतावत असल्याची बोचरी टीका लक्ष्मण हाके यांनी केली.

📌 महत्त्वाच्या बातम्या

MHD News

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही