सुप्रिया सुळेंनी उडवली खिल्ली, पण आता रोहित पवारांच्या नागपुरातील ‘त्या’ बैठकांचे पुरावे समोर

रोहित पवारांच्या गुप्त बैठकांचा दावा सुप्रिया सुळेंनी फेटाळला होता. मात्र, आता २२ ते २४ नोव्हेंबरदरम्यान नागपुरात झालेल्या बैठकांचे तपशील समोर आले आहेत.

Published On: 

MHD LOGO

प्रतिनिधी, २५ नोव्हेंबर: राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षातील आमदार रोहित पवार यांच्या नागपूर दौऱ्यावरून राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी रोहित पवार यांच्या गुप्त बैठकांचा दावा ‘हास्यास्पद’ ठरवत फेटाळला होता. तसेच रोहित पवार काल नागपुरात नव्हते, असेही त्या म्हणाल्या होत्या. मात्र, आता रोहित पवार यांनी २२ ते २४ नोव्हेंबरदरम्यान नागपूर आणि विदर्भात घेतलेल्या बैठकांचे तपशील व पुरावे समोर आले आहेत.

रोहित पवार यांच्या या बैठकांना २२ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता सुरुवात झाली. पहिली बैठक नागपूरमधील फेट्री गावातील माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या एनआयटी कॉलेजमध्ये पार पडली. या बैठकीत स्टेजवर अनिल देशमुख यांच्यासह सलील देशमुख आणि पक्षाचे प्रवक्ते प्रवीण कुंटे पाटील उपस्थित होते.

यानंतर रोहित पवार यांनी विदर्भातील प्रत्येक जिल्ह्याच्या पदाधिकाऱ्यांसोबत स्वतंत्र बैठका घेतल्याची माहिती आहे. या बैठकांना माजी आमदार चरण वाघमारे, अतुल वांदिले तसेच अमरावती आणि बुलढाणा जिल्ह्यांचे जिल्हाध्यक्ष उपस्थित होते. विदर्भातील प्रमुख पदाधिकाऱ्यांसह सुमारे १०० जण या बैठकांमध्ये सहभागी झाले होते.

या सर्व बैठकांमध्ये रोहित पवार यांच्या टीमकडून एक प्रेझेंटेशन देण्यात आले, तसेच त्यांच्या प्रस्तावित दौऱ्याचा मॅपही दाखवण्यात आला. ४ ते ९ डिसेंबरदरम्यान शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर नागपुरात काढण्यात येणाऱ्या भव्य मोर्चाच्या पार्श्वभूमीवर ही तयारी सुरू असल्याचे समजते. आता या बैठकांचे तपशील समोर आल्याने या विषयाची पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.

📌 महत्त्वाच्या बातम्या

MHD News

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही